मुंबई – महाविकास आघाडीपुढे सहाही जागा जिंकण्याचे आव्हान असताना, भाजपाने पुन्हा आपल्या पाचही जागा सुरक्षित ठेवून आघाडीला तडाखा देऊन सरकार स्थिर नाही, हा संदेश या निवडणुकीत दिला आहे…भाजपचे सर्व ५ उमेदवार निवडून आले असून सत्ताधारी महाविकास आघाडीचे चंद्रकांत हंडोरे (काँग्रेस) यांचा पराभव झाला. राज्य विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी सोमवार दि. 20 जून 2022 रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. उमेदवारांना जिंकण्यासाठीचा 2600 हा मतमूल्यांचा कोटा पूर्ण करण्यासाठी फेरीनिहाय मिळालेले मतमूल्य पुढीलप्रमाणे :
पहिल्या फेरीअखेर राम शिंदे (भाजपा) यांना 3000, श्रीकांत भारतीय (भाजपा) यांना 3000, एकनाथ खडसे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांना 2900, प्रवीण दरेकर (भाजपा) यांना 2900, रामराजे नाईक निंबाळकर (राष्ट्रवादी काँग्रेस) यांना 2700, श्रीमती उमा खापरे (भाजपा) यांना 2700, सचिन अहिर (शिवसेना) यांना 2600 आणि आमश्या पाडवी (शिवसेना) यांना 2600 तर पाचव्या फेरीअखेर प्रसाद लाड (भाजपा) यांना 2857 इतके मतमूल्य मिळून त्यांनी विजयासाठीचा कोटा पूर्ण केला.
दहाव्या व शेवटच्या फेरीअखेर भाई जगताप (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांना 2474 इतकी मतमूल्य तर चंद्रकांत हंडोरे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांना 2200 इतकी मतमूल्य मिळाली. या फेरीअखेर अधिक मतमूल्यांच्या आधारे श्री.जगताप हे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.राजेंद्र भागवत यांनी जाहीर केले.
प्रवीण दरेकर, भाजप मते : 29, विजयी
राम शिंदे, भाजप मते : 30, विजयी
श्रीकांत भारतीय, भाजप मते : 30, विजयी
उमा खापरे, भाजप मते : 27, विजयी
प्रसाद लाड, भाजप मते : 28, विजयी
अटीतटीच्या लढतीत प्रसाद लाड यांनी २८ मते घेऊन विजय मिळवला.
एकनाथ खडसे, राष्ट्रवादी मते : 29, विजयी रामराजे निंबाळकर, राष्ट्रवादीमते : 28, विजयी आमशा पाडवी, शिवसेना मते : 26, विजयी सचिन अहिर, शिवसेना मते : 26, विजयी भाई जगताप, काँग्रेस मते : 26, विजयी चंद्रकांत हंडोरे, काँग्रेस मते : 22, पराभूत