Wednesday, April 24, 2024
Homeराज्यसुधारित आदेशनुसार नांदेड जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने ३० जानेवारी रोजी बंद...

सुधारित आदेशनुसार नांदेड जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने ३० जानेवारी रोजी बंद…

Share

नांदेड – महेंद्र गायकवाड

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. या निवडणुकीचे मतदान संपण्यापुर्वी 48 तास अगोदर ते मतदान संपेपर्यंत 28 ते 30 जानेवारी 2023 या कालावधीत लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 135 (सी) मधील तरतुदीनुसार नांदेड जिल्ह्यातील किरकोळ देशी, विदेशी व ताडी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले होते परंतु मा.उच्च न्यायालय मुंबई यांनी दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी जारी केलेल्या आदेशाप्रमाणे केवळ मतदानाच्या दिवशी म्हणजे 30 जानेवारी रोजी कोरडा दिवस ठेवण्याबाबत निर्देशीत करण्यात आहे.

नांदेड जिल्ह्यातील किरकोळ देशी, विदेशी व ताडी मद्यविक्री अनुज्ञप्त्या मतदानाच्या दिवशी सोमवार 30 जानेवारी 2023 रोजी संपूर्ण दिवस बंद राहतील. या आदेशाचे उल्लंघन करून मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करून अनुज्ञप्ती रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही आदेशात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: