HomeMarathi News Todayलखनऊच्या पंचतारांकित हॉटेलला आग...दोन ठार, अनेक जण जळाले...

लखनऊच्या पंचतारांकित हॉटेलला आग…दोन ठार, अनेक जण जळाले…

न्यूज डेस्क – उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील पंचतारांकित हॉटेल लेवाना स्वीटमध्ये भीषण आग लागली.या आगीत अनेक जण जखमी झाले असून 1 पुरुष आणि 1 महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हे हॉटेल हजरतगंज परिसरात आहे. हॉटेलमध्ये अजूनही अनेक लोक अडकले आहेत. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून हॉटेलमधील लोकांना बाहेर काढण्याचे आणि आग विझवण्याचे काम करत आहे.

हॉटेलच्या खिडक्यांच्या काचा फोडून लोकांना बाहेर काढले जात आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा संशय आहे.ज्या मजल्यावर आग लागली त्या मजल्यावर ३० खोल्या असल्याचं सांगण्यात येत आहे.त्यापैकी 18 खोल्या बुक करण्यात आल्या होत्या.अपघाताच्या वेळी तेथे 40 ते 45 लोक असावेत.

हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर बचावकार्य सुरू आहे.खोली क्रमांक 214 मध्ये एक कुटुंब अडकल्याची माहिती मिळाली आहे.एका खोलीत दोन जण बेशुद्ध पडले.चौथ्या मजल्यावर फक्त बार आहे. कटरने काच कापला जात आहे.एका माणसाला दोरीने बांधून पायऱ्यांवरून बाहेर काढण्यात आले. हॉटेलमधून बाहेर काढण्यात आलेल्या सर्व लोकांना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात पाठवले जात आहे. सकाळी आठच्या सुमारास हॉटेलमधून धूर निघत असल्याचे दिसले. अलार्म वाजल्यावर लोकांना याची माहिती मिळाली.

हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली आणि लगेचच संपूर्ण हॉटेलमध्ये पसरली.अग्निशमन दलाच्या सुमारे 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.अग्निशमन दलाचे जवान खिडक्यांमधून हॉटेलमध्ये घुसून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.काही लोकांना हॉटेलमधून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले.

सौजन्य ANI
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments