Homeराज्यमालवांचल प्रांतिय पोवार परमार समाज बांधवांचे रामटेक येथे जंगी स्वागत...

मालवांचल प्रांतिय पोवार परमार समाज बांधवांचे रामटेक येथे जंगी स्वागत…

राजु कापसे
रामटेक

रामटेक – शितलवाडी येथील टी-पॉईंट येथे काल दि. २२ ऑगस्ट ला राष्ट्रीय पवार समाज महासभेचे पदाधिकारी व मालवांचल जिल्हा सिहोर (मध्यप्रदेश) येथील समाज बांधवांचे काल दि. २२ ऑगस्ट ला आगमण झाले असता त्यांचे पोवार समाज बहुउद्देशिय संस्था रामटेकच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय पोवार महासभेचे अध्यक्ष मुरलीधर टेंभरे, मालवांचल येथील दुर्गाप्रसाद परमार, अशोक परमार, विनोद परमार, बन्नेसिंग परमार अध्यक्ष जगदीश मंदीर ट्रस्ट सिहोर आदींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

भारतवर्षात विखुरलेल्या राजाभोजवंशीय पवार / परमार समाजाच्या एकतेच्या उद्देशाने बैतुल, वर्धा, नागपुर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील पवार समाज बांधवांच्या भेटी घेण्याचा तथा आपण सर्व एक आहोत यावर चर्चा करण्यासाठी हा दौरा करण्यात येत असल्याचे यावेळी स्वागत कार्यक्रम आयोजकांनी माहिती देतांना सांगीतले. बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये महासभेच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली.

याप्रसंगी पोवार समाज बहुउद्देशीय संस्था रामटेकचे अध्यक्ष भगवानदास बिसने, उपाध्यक्ष छमेशकुमार पटले, सचिव संजय बिसेन, सहसचिव आशिष शरणांगत, डाॅ. ओंकार चौधरी, प्रा. रविंद्र बोपचे, शाम पटले, उमेश पटले, खरकसिंग बिसेन, रामरतन भगत, धनराज शरणांगत, जगदीश पटले, श्री. चौधरी, जयसिंग बिसेन, सुभाष बिसने, राहुल जयतवार यांचेसह समस्त समाज बांधव उपस्थीत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments