Thursday, April 18, 2024
Homeनोकरीवेतन देयकासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची ऑनलाईन आज्ञावलीत माहिती नोंदविणे आवश्यक...

वेतन देयकासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची ऑनलाईन आज्ञावलीत माहिती नोंदविणे आवश्यक…

Share

महेंद्र गायकवाड
नांदेड

कर्मचारी सर्वंकष माहितीकोष-2022 तयार करण्याचे काम जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयातील व त्यांच्या आस्थापनेवरील नियमित, नियमितेत्तर, रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी व तदर्थ तत्वावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची 1 जुलै 2022 या संदर्भ दिनांकाची माहिती ऑनलाईन आज्ञावली मध्ये नोंदविणे आवश्यक आहे.

ही माहिती ऑनलाईन नोंदवून जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे प्रमाणपत्र-1 जोडल्याशिवाय वेतन देयके कोषागार कार्यालयाकडुन स्विकारण्यात येणार नाहीत. याची सर्व राज्य शासकीय आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंद घ्यावी. तसेच ज्या शासकीय कार्यालयांची वेतन देयके कोषागारात सादर होत नाहीत. अशा सर्व कार्यालयानी सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांची व रिक्त पदांची माहिती ऑनलाईन आज्ञावलीद्वारे नोंदणी करावी. कर्मचारी सर्वंकष माहितीकोष 2022 बाबत ऑनलाईन आज्ञावलीमध्ये माहिती नोंदवावी. अधिक माहितीसाठी उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय नांदेड व त्यांचा दुरध्वनी क्रमांक 02462-252775 तसेच कार्यालयाचा ई-मेल [email protected] येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक निखील बासटवार यांनी केले आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: