Homeगुन्हेगारीमनसर येथे उभ्या ट्रकला दिली मागून येणाऱ्या ट्रकने धडक…एकाचा मृत्यू तर दोन...

मनसर येथे उभ्या ट्रकला दिली मागून येणाऱ्या ट्रकने धडक…एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी

रामटेक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

रामटेक -: ( तालुका प्रतिनिधी )

तालुक्यातील तथा रामटेक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणाऱ्या मनसर येथील यादव धाब्याजवळ उभ्या ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने एक जण मयत तर दोन जण जखमी झाल्याची घटना आज ३० ऑगस्टला ३ ते ३.३० वाजता दरम्यान घडली.

सविस्तर वृत्तानुसार तसेच रामटेक पोलीस स्टेशन येथून प्राप्त माहितीनुसार दुर्गेश घोडमाडे वय २३ वर्ष राहणार डोंगरी खुर्द तहसील पारशिवनी हे मनसर मार्गे तिरोडाकडे जात असताना मनसर जवळील यादव ढाब्या समोर त्यांच्या ट्रक क्रमांक ४० बी.एल. २८६७ चा समोरील टायर फुटला. दरम्यान ते यावेळी टायरच्या दुरुस्तीचे काम करीत होते.

दरम्यान याचवेळी मागून एम एच ४० ए.के. ४८९६ च्या चालकाने स्वतःच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणाने चालवीत घोडमाडे यांच्या उभ्या ट्रकला मागून धडक दिली. यात घोडमाडे हे त्यांच्या ट्रकच्या पुढील चाकात आल्याने ते गंभीर जखमी झाले तसेच मागून धडक देणाऱ्या चाळीस ए.के. ४८९६ यातील चालक व क्लीनर सुद्धा यावेळी गंभीर जखमी झाले असून सर्वांना नागपूर येथील रुग्णालयात हलविले असता दुर्गेश घोडमाडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

रामटेक पोलिसांनी कलम २७९, ३३७, ३३८ नुसार गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संजय खोब्रागडे हे करीत आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
राजू वसंतराव कापसे शितलवाडी परसोडा रामटेक जि, नागपूर हे महाव्हाईस न्यूज चे संस्थापक सदस्य असून ते गेल्या पाच वर्षापासून रामटेक प्रतिनिधी म्हणून काम सांभाळतात...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments