Homeशिक्षणऔरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी...

औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी घेतला आढावा…

मुंबई – औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामाचा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आढावा घेतला. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ.दिलीप म्हसेकर, जे.एम.सी. औरंगाबादचे अधिष्ठाता वर्षा राठी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव शिवाजी पाटणकर, उपसचिव प्रकाश सुरवसे, वैशाली सुळे, आदी उपस्थित होते.

औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे विविध प्रलंबित प्रश्न, प्रशासकीय अधिकारी व अधीक्षक यांच्या पात्रता निश्चित करण्यात करणे, कार्यक्षम वैद्यकीय अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकारी नियमितरित्या भरणे, रुग्णालयात मंजूर असलेल्या 1177 खाटांपेक्षा जास्त रुग्ण खाटा सुरु असल्याने निधीचा कमतरता, औषधी, सर्जिकल, यंत्रसामुग्री आणि उपकरणे, पूर्णवेळ प्रशासकीय अधिकारी यांची नियुक्ती करणे अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नर्सिंग पदाची भरती बाबत जाहिरात देवून ती पदे तातडीने भरावी, असे निर्देश श्री.देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. वैद्यकीय शिक्षण विभागातील अध्यापकीय पदे व वर्ग 3 व 4 गटातील रिक्त पदे प्राधान्याने भरण्याची कार्यवाही करावी. औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाबाबतच्या विविध विषयांच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करुन संबंधित विषयाला गती द्यावी, असे निर्देशही मंत्री श्री.देशमुख यांनी दिले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments