Homeराज्यसांगली जिल्ह्यातील उपेक्षित आणि निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांना न्याय मिळावा यासाठी सांगलीमध्ये भाजपा...

सांगली जिल्ह्यातील उपेक्षित आणि निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांना न्याय मिळावा यासाठी सांगलीमध्ये भाजपा कार्यकर्त्यांची बैठक संपन्न…

सांगली – ज्योती मोरे

सांगली सांगली जिल्ह्यामध्ये भाजप पक्ष वाढवण्यामध्ये आणि नावारूपाला आणण्यामध्ये ज्या काही कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून मेहनत आणि अथक परिश्रम घेतले आहे अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना सध्या भाजपाच्या नेत्यांकडून टाळले जात आहे.

शिवाय त्यांना कोणत्याही कार्यक्रमासाठी सहभागी करून घेतले जात नाही. निष्ठावंत कार्यकर्त्यांना फक्त गृहीत धरलं जात आहे. सध्या सांगली जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती असल्याने नाराज झालेल्या ज्येष्ठ भाजपा कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या विरोधात आवाज उठवण्याचे ठरवले आहे. यासंदर्भात आज जिल्ह्यातील नाराज कार्यकर्त्यांची बैठक सांगली येथे पार पडली.

ज्या कार्यकर्त्यांनी अटीतटीच्या काळामध्ये खिशात पैसे नसतानाही इतरांकडून पैसे उसने घेऊन भाजपाच्या कार्यासाठी सांगलीमध्ये येऊन आपले कार्य केले अशा लोकांना पक्षाकडून न्याय दिला जावा. यासाठी भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीतील तसेच केंद्रीय स्तरावरील नेत्यांशी लवकरच संपर्क करणार असल्याचे प्रदीप वाले आणि प्रताप पाटील यांनी सांगितले आहे.

सदर बैठकीस प्रसन्न गोसावी, विनायक खरमाटे, गोविंद पाटील, श्रीकांत शिंदे, मंगलनाथ देशमुख, संजय हिरेकर, भारत निकम, लता डफळे, राजू पाटील आदींसह इतर अनेक निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments