मनसर – राजू कापसे
दिनांक १६ जून २०२२ ला ग्राम पंचायत कार्यालय मनसर येथे उपविभागीय अधिकारी रामटेक मा श्रीमती वंदना सवरंगपते,तहसीलदार रामटेक मा श्री बाळासाहेब मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत व सौ योगेश्वरी हेमराज चोखांंद्रे सरपंच ग्राम पंचायत मनसर यांच्या अध्यक्षतेखाली “लक्ष्मी मुक्ती योजनेची” सभा संपन्न झाली.
सदर योजनेचा प्रमुख हेतू असा की, पतीच्या शेती किंवा प्लॉटच्या ७/१२ मध्ये पत्नीच्या नावाची देखील नोंद असावी, जेणेकरून पती भविष्यात अनावधानाने परस्पर संबंधित मालमत्तेची विक्री करणार नाही आणि संबंधित कुटुंब उघड्यावर पडणार नाही, ह्याबाबत मा सवरंगपते व मस्के यांनी यथोचित मार्गदर्शन केले तसेच गावातील जास्तीत जास्त महिलांनी सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सौ योगेश्वरी हेमराज चोखांद्रे सरपंच ग्राम पंचायत मनसर यांनी केले.

त्यावेळी उपसरपंच चंद्रपाल नगरे, हेमराज चोखांंद्रे,ग्राम पंचायत सदस्य नंदकिशोर चंदनखेडे,योगेश गोस्वामी,संगीता पंधराम, काजल कठोते, सीमा गजबेस,लता उईके,आम्रपाली नगरकर, ग्राम विकास अधिकारी श्री पवन उईके,तलाठी प्रतिक काष्टे, पोलीस पाटील विमलेश बिहाळे सह अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.