Homeग्रामीणस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव करिता मूर्तिजापूर व्यापारी महासंघाची बैठक संपन्न...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव करिता मूर्तिजापूर व्यापारी महासंघाची बैठक संपन्न…

मूर्तिजापूर शहरातील सर्वच प्रकारच्या व्यवसायिक पदाधिकाऱ्यांची व्यापारी महासंघ द्वारे दिनांक 2 ऑगस्ट रोजी विठ्ठल मंदिर स्टेशन विभाग येथे सभा आयोजित करण्यात आली होती.

सदर सभेत स्वातंत्र्य त्याचा अमृत महोत्सव साजरा करण्या करिता आप आपल्या दुकान व घरा वर झंडा लाऊन तसेच कॉम्प्लेक्स,चौक वर तिरंगी विद्युत रोषणाई करून साजरा करण्याचे आवाहन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक भावनांनी यांनी केले.

करिता व्यापारी महासंघातर्फे प्रत्येक आस्थापनेस झेंडा देण्याचेही नियोजित करण्यात आले आहे. तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चांगल्या पद्धतीने आणि स्वयं स्फूर्ती ने साजरा करण्याच्या हिशोबाने लोकांना प्रेरणा मिळावी.

याकरिता दिनांक 13 रोजी सकाळी ९ते १० दरम्यान श्री स्वामी समर्थ मंदिर जुनी वस्ती येथून स्टेशन विभागातील जयस्थंभ चौक पर्यंत सर्व व्यापारींची मोटरसायकल रॅली काढण्याचे सुद्धा नियोजन करण्यात आले आहे. सदर बैठकीमध्ये शहरातील सर्व आस्थापनांचे मालक सर्व पदाधिकारी ची उपस्थिती होती

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments