Homeराज्यनरखेड तालुक्यातील भारसिंगी येथील अरविंदबाबू देशमुख महाविद्यालयाचे मानसिक आरोग्यावर कार्यशाळा...

नरखेड तालुक्यातील भारसिंगी येथील अरविंदबाबू देशमुख महाविद्यालयाचे मानसिक आरोग्यावर कार्यशाळा…

नरखेड – अतुल दंढारे

अरविंदबाबू देशमुख महाविद्यालय भारसिंगी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि शालेय मानसिक आरोग्य जनजागृती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम 2 संटेंबर रोजी महाविद्यालयात घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष्स्तानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रकाश पवार सर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शासकीय मानासिक रुग्णालय नागपूर येथील डॉ . रीता जैन प्रमुख अतिथी महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ साधना जिचकार उपस्थित होत्या.

आपल्या मार्गदर्शना मधे डॉ रीता जैन यांनी विद्यार्थ्यांना होत असलेले शारीरिक विकार आणि मानसिक व्याधी इत्यादी.बाबींवर प्रकाश टाकला विद्यार्थ्याच्या होत असलेल्या आत्महत्यांबाबत आणि त्यावर कोणत्या उपाययोजना करता येईल या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष भाषणातून विद्यार्थ्याच्या वाढत्या आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त केली आणि त्यावर उपाययोजना केली पाहिजे असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमाला डॉ. अविनाश इंगोले सर, डॉ.अमित गद्रे सर प्रा. सुरेंद्र सिनकर सर, डॉ. मणियार सर व इतर प्राध्यापक इतर शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा.राजेंद्र घोरपडे सर यांनी केले तर आभार रा. से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. आशिष काटे सर यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments