अकोल्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांचा भांगडा नृत्याचा Video सध्या सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर अवघ्या राज्यात एक डॅशिंग आमदार म्हणून ओळख असलेले राज्यमंत्री मात्र आज अकोल्यात त्याचं एक वेगळ रूप बघायला मिळाल आहे. बच्चू कडू आज अकोल्यात एका लग्न समारंभासाठी आले असतांनाया लग्नात खास पंजाबवरून भांगडा पथक आलं होतंय.
यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या सन्मानार्थ पंजाबी ढोल वाजविण्यात आलाय. यावेळी राज्यमंत्री बच्चू कडूंनाही भांगड्यावर थिरकायचा मोह आवरला नाहीय. अन त्यांनीही यावेळी फेर धरत भांगडा नृत्याचा आनंद घेतलाय. याआधी पालकमंत्र्यांनी एका अनाथ मुलीचे कन्यादान करून जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे…
खाली हा व्हायरल व्हिडीओ