सांगली प्रतिनिधी : ज्योती मोरे.
कॉंग्रेस नेते पृथ्वीराज पाटील यांच्या माध्यमातून सांगलीत देशातील पहिली अंखड तेवणारी शिवज्योत प्रज्वलीत करण्यात आली आहे. ही शिवज्योत छत्रपतींचा इतिहास डोळ्यासमोर उभा करून सातत्याने सर्वांना प्रेरणा देणारी असून या उपक्रमाचे मी कौतुक करतो, असे गौरोवोद्गार गृह व परिवहन राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी काढले. मंगळवारी रात्री ना. पाटील यांनी सांगली येथील शिवतिर्थावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून शिवज्योतीची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.सतेज पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहे.
शिवराज्याभिषेक रायगडावर मोठ्याप्रमाणात साजरा केला जातो. विशेष करून सांगलीमध्ये पृथ्वीराज पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रायगडावर प्रज्वलीत केलेली देशातील पहिली शिवज्योत आपण सांगलीत अंखडपणे तेवत ठेवत आहात. ही शिवज्योत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची दखल घेणारी किंबहुना प्रेरणा देणारी ज्योत आहे. शिवाजी महाराजांचे नाव घेतले तरी आपल्या अंगावर शहारे येतात. एवढे कर्तृत्ववान काम त्यांनी केले आहे.
पृथ्वीराज पाटील व विरेंद्र पाटील यांनी उपक्रम राबविला. शिवराज्याभिषेक दिनाची परंपरा सुरू केली आणि देशातली पहिली शिवज्याोत प्रज्वलीत केली त्याबद्दल त्यांचे कौतुक आणि अभिनंदन करतो तसेच या उपक्रमास शुभेच्छा देतो. पृथ्वीराज पाटील हे नेहमीच लोकोपयोगी कार्यक्रम राबवित असतात. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
अशा शब्दात सतेज पाटील यांनी पृथ्वीराज पाटील यांचे कौतुक केले. यावेळी कॉंग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवा नेते ऍड. विरेंद्र पाटील, रवी खराडे, मराठा सेवा संघाचे डॉ. संजय पाटील, नितीन चव्हाण, नगरसेवत तौफिक शिकलगार, उद्योजक अजय देशमुख, राहुल जाधव, राहुल पाटील, योगेश पाटील, सचिन घेवारी, ए. डी. पाटील, अलताब पेंढारी, चेतन दडगे, सनी धोतरे, आयुब निशाणदार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.