बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले बाळापूरचे आमदार नितीन देशमुख बंडखोर आमदारांच्या ग्रुप फोटोत दिसले याच बरोबर मध्यरात्री सुरतच्या विमानतळावरही मिडीयाच्या कॅमेऱ्यात दिसले आहेत. याचबरोबर एकनाथ शिंदेच्या शेजारी बसून असलेले अकोल्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री बच्चू कडू हेही दिसल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. काल अकोल्यात माझे बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांनी दिली होती.
नितीन देशमुख आणि एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे समजते. सूरतला आल्यामुळे देशमुख नाराज आहेत. या नाराजीतूनच त्यांचे शिंदे यांच्यासोबत खटके उडाले. त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. देशमुख यांना सध्या सूरत येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, तिथेही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. विशेष म्हणजे रुग्णालयात जाण्यापूर्वी त्यांना हॉटेलमधून बाहेर जायचे होते. यावेळी त्यांना पोलिसांनी अडवले. त्यामुळे त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली. त्यानंतर ते हॉटेलच्या बाहेर येऊन बसले. मात्र, वाहन नसल्याने ते पंधरा मिनिटे तिथेच बसून राहिले मात्र तेथून त्यांना पळ काढता आला नाही.
एकनाथ शिंदे यांच्या सोबत ग्रुप फोटोत शेजारी बसलेले अकोल्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री बच्चू कडू हेही दिसल्याने प्रहार कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच संभ्रम झाला असून आधीच राज्यमंत्री असलेले बच्चू कडू यांना कोणते पद हवे?…एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांचं कट्टर हिंदुत्व पाहिजे यासाठी बंद केले असल्याचे प्रसार माध्यमातून समोर येत आहे, मात्र हा खेळ कुणी रचला, कोण पाठीशी आहे हे सर्वश्रुत आहे. विमानतळावर भाजपचे मोहित कंबोज आणि संजय कुटे बंडखोर आमदारांसोबत दिसले आहेत.
एकनाथ शिंदे सोबत असलेल्या सेना आमदारांची यादी
- एकनाथ शिंदे – कोपरी 2 अब्दुल सत्तार – सिल्लोड, औरंगाबाद 3. शंभुराज देसाई – पाटण, सातारा 4. संदिपान भुमरे – पैठण, औरंगाबाद 5. भरत गोगावले – महाड, रायगड 6. नितीन देशमुख – बाळापूर, अकोला 7.अनिल बाबर – खानापूर-आटपाडी, सांगली 8.विश्वनाथ भोईर – कल्याण पश्चिम 9. लता सोनवणे- चाेपडा 10. संजय गायकवाड – बुलडाणा 11. संजय रायमूलकर – मेहकर 12. महेश शिंदे – कोरेगाव, सातारा 13. शहाजी पाटील – सांगोला, सोलापूर 14. प्रकाश आबिटकर – राधानगरी, कोल्हापूर 15 संजय राठोड – दिग्रस, यवतमाळ 16. ज्ञानराज चौगुले – उमरगा, उस्मानाबाद 17. तानाजी सावंत – परंडा, उस्मानाबाद 18. संजय शिरसाट – औरंगाबाद पश्चिम 19. रमेश बोरनारे – वैजापूर, औरंगाबाद 20. श्रीनिवास वनगा, पालघर 21. बालाजी कल्याणकर -नांदेड 22. बालाजी किणीकर- अंबरनाथ 23. सुहास कांदे -नांदगाव 24. महेंद्र दळवी- अलिबाग 25. प्रकाश सुर्वे -मागाठणे 26. महेंद्र थोरवे -कर्जत 27. शांताराम मोरे -भिवंडी 28.किशोर पाटील- पाचोरा 29. चिमणराव पाटील- एरंडोल 30. प्रदीप जैस्वाल- औरंगाबाद