Friday, March 29, 2024
Homeराज्यमिरज सांगली रोड वरील मिरजवाडी बेथेलहेमनगर नागरी समस्या संदर्भात तीव्र आंदोलन करून...

मिरज सांगली रोड वरील मिरजवाडी बेथेलहेमनगर नागरी समस्या संदर्भात तीव्र आंदोलन करून आमदार-खासदारांना निवेदन…

Share

सांगली प्रतिनिधी — ज्योती मोरे

मिरज सांगली रोड वरील मिरज वाडी बेथेलहेमनगर मधील नागरी समस्यांच्या बाबत आज आंदोलन करून नामदार जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीर दादा गाडगीळ, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पृथ्वीराज बाबा पाटील यांना मिरजवाडीतील नागरी प्रश्नांसंदर्भात निवेदन देण्यात आले.

सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका वार्ड क्रमांक 19 मधील घरांना घरफाळा सुरू करणे. रस्ते /गटारी /कचरा घंटागाडी/ औषध फवारणी समस्या सोडवून वहिवाटीचा रस्ता त्वरित खुला करून नागरी समस्या त्वरित सोडवणे बाबत
मिरजवाडी (बेथेल हेमनगर ) येथील नागरिक गेली 80 वर्ष वास्तव्यास आहेत मिरजवाडी तील नागरिकांच्या वतीने आपणांसमोर मागण्या पुढील प्रमाणे

1)मिरजवाडी झोपडपट्टी नियमितीकरण करून 7/12 घर फाळा सुरू करण्यात यावा.

2) मिरज वाडीतील गटारी फुटल्यामुळे सांडपाणी घरामध्ये शिरत आहे बेथलेम नगर मधील सात गल्ल्यांचे सांडपाणी मिरजवाडीतील गटारीला जोडल्यामुळे गटारीची उंची दीड फुटाची असल्यामुळे गटारी भरून वाहत आहेत मोठ्या प्रमाणात सांडपाणी येत असल्यामुळे गटार लहान पडत आहे या सांडपाण्यामुळे बरीच घरे बाधित झाले आहेत गटारीचे सांडपाणी सर्वत्र पाणी पसरलेमुळे आरोग्याचा प्रश्न बिकट निर्माण झाला आहे यावर उपाय म्हणून कायमस्वरूपी ड्रेनेज व्यवस्था मिरजवाडी या भागामध्ये करण्यात यावी .

3) मिरजवाडी चा वहिवाटीचा रस्ता प्लॉट नंबर 919 लगत आहे समर्थ हॉस्पिटलचे न्यूरो सर्जन डॉक्टर रवींद्र पाटील व आनंदराव पारगावकर यांनी 45 फुटावर अतिक्रमण करून रस्त्यावरच भिंत बांधली आहे व वहिवाटीचा रस्ता बंद करण्यात आलेले आहे त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशमन ची गाडी ॲम्बुलन्सची मै ला उठावाची गाडी औषध फवारणी ची गाडी धूर फवारणीची गाडी येऊ शकत नाही तसेच आबा पाटील यांनी चाळीस फुटाचा रस्ता बळकावून त्यावर ढाबा घातलेला आहे समर्थ हॉस्पिटलचे रवींद्र पाटील व आनंदराव पारगावकर यांना देण्यात आलेली बांधकाम परवानगी व त्यांचे झालेले अतिरिक्त बांधकाम याची चौकशी करण्यात यावी तसेच त्यांनी अडवलेला 45 फुटाचा रस्ता त्वरित खुला करण्यात यावा व नागरिकांची गैरसोय टाळावी

4) मिरज वाडी मध्ये कचरा उठाव करण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था कायमस्वरूपी करण्यात यावी याप्रसंगी शिवाजी त्रिमुखे बाबासाहेब वाघमारे संगीता आवळे अनिल गायकवाड बाळासाहेब माने स्वप्निल झेंडे सुशांत तांबे संदीप जगधने प्रमिला मोरे साहिल गायकवाड सागर गायकवाड हेमंत जोसेफ निलेश जोशी संतोष वायदंडे रेखा सकटे शेखर मोरे दिनेश काळे प्रफुल्ल लोंढे याप्रसंगी बहुसंख्य नागरिक महिला उपस्थित होते


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: