HomeMarathi News Todayमोहम्मद शमीची EX वाइफ हसीन जहाँच्या 'या' पोस्टने शमीची उडविली झोप…हार्दिक पांड्याचा...

मोहम्मद शमीची EX वाइफ हसीन जहाँच्या ‘या’ पोस्टने शमीची उडविली झोप…हार्दिक पांड्याचा फोटो शेअर करत…

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची माजी पत्नी हसीन जहाँची सोशल मीडिया पोस्ट खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने कॅप्शनसह हार्दिक पांड्याचा फोटो शेअर करून तिच्या माजी पतीला टोमणे मारल्याचे दिसते. भारताला पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून देण्यात हार्दिक पांड्याचा मोठा हात होता. अष्टपैलू खेळासाठी हार्दिकला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. हार्दिकने षटकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता.

हार्दिकचा फोटो शेअर करत हसीन जहाँने पाकिस्तानविरुद्ध भारताच्या पाच विकेट्सने मिळवलेल्या विजयानंतर लिहिले, ‘अभिनंदन, शानदार विजय. देशाला विजय मिळवून देणाऱ्या आपल्या सिंहांचे खूप खूप आभार. देशाचा दर्जा, देशाची प्रतिष्ठा, ‘ईमानदारों और देशभक्तों से ही बचती है ना कि अपराधियों और औरतबाजों से।’

हसीन जहाँने मोहम्मद शमीचे नाव न घेता अशाप्रकारे त्याच्यावर निशाणा साधल्याचे दिसत आहे. वास्तविक शमी आशिया चषक 2022 साठी भारतीय संघाचा भाग नाही. टीम इंडियाने पहिले दोन सामने जिंकून सुपर 4 मध्ये स्थान मिळवले आहे. आता त्याला सुपर फोरमध्ये तीन सामने खेळायचे आहेत, त्यापैकी एक सामना पाकिस्तान किंवा हाँगकाँगविरुद्ध, तर उर्वरित दोन सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तानविरुद्ध खेळायचे आहेत.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments