Homeराज्यसहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवानेंच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आंदोलन…

सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवानेंच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आंदोलन…

पोलीस स्टेशन पुढे आंदोलन…बदली तथा निलंबन मागे घेण्याचा रेटा, दिले निवेदन

रामटेक -: ( तालुका प्रतिनिधी )

शहराला लागुनच असलेल्या शितलवाडी येथील सपन जयस्वाल यांच्या पेट्रोल पंप वर दोन आरोपींनी दगडफेक केली. तेव्हा या घटनेची तक्रार पोलिस स्टेशन रामटेक ला देण्यासाठी गेलेल्या पेट्रोल पंप चालकासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक सोनवाने यांची काही कारणास्तव चांगलीच बाचाबाची झाली. दरम्याने सोनवाने यांनी पेट्रोलपंप चालक जयस्वाल याला मारहानही केल्याची सुत्रांची माहीती आहे. यानंतर हे सर्व प्रकरण स्थानीक आमदारांपर्यंत गेले. त्यांनी यामध्ये हस्तक्षेप केला. या प्रकरणानंतर पोलीस विभागाच्या वरीष्ठांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक सोनवाने यांची तत्काळ पोलीस मुख्यालय नागपुर येथे बदली केली व नंतर त्यांना निलंबीतही केले.

तेव्हा हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले व हा एका पोलिस अधिकाऱ्यावर अन्याय झालेला असल्याची जनसामान्यात चर्चा उठली. त्यानुसार आज दि. २६ जुलै स्थानिक पोलीस स्टेशन पुढे सर्वपक्षीय पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत विविध नारेबाजी केली. तसेच सपोनी विवेक सोनवाने यांची बदली व निलंबन मागे घ्या असा रेटा लावत उपविभागीय पोलीस अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (महसुल) यांना या मागणीचे एक निवेदन देण्यात आले. मोर्चा दरम्यान प्रहार चे जिल्हाध्यक्ष रमेश कारामोरे तथा भाजपचे राजेश ठाकरे यांचेसह विविध पदाधिकार्‍यांनी उपस्थितांना एका योग्य व कर्तबगार पोलिस अधिकाऱ्यावर अन्याय झाला असल्याबाबद संबोधन केले. यानंतर निवेदन देण्यात आले. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष रमेश कारामोरे, भाजप चे राजेश ठाकरे यांचेसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते तथा नागरीक उपस्थीत होते.

वरीष्ठ निर्णय घेतील – डि.वाय.एस.पी. बागबान

सध्या रामटेक येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा कार्यभार कन्हान येथील उपविभागीय पोलिस अधिकारी मुख्तार बागबान हे तात्पुरत्या स्वरूपात सांभाळत आहे. आजच्या २६ जुलै च्या मोर्चा प्रकरणाबद्दल त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की मागणीचे हे निवेदन आम्ही वरीष्ठांना पाठवु व नंतर ते योग्य निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments