HomeMarathi News Today'या' प्रकरणावरून खासदार नवनीत राणा संतापल्या...पोलिसांसोबत घातली हुज्जत...पाहा Video

‘या’ प्रकरणावरून खासदार नवनीत राणा संतापल्या…पोलिसांसोबत घातली हुज्जत…पाहा Video

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) एका प्रकरणावरुन फार आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये जावून त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली आहे. इतकेच नाहीतर माझा फोन Call का रेकॉर्ड केला यावरून राजापेठ पोलीस स्टेशन ठाणेदार ठाकरे यांना सुनावले.

अमरावतीत सध्या लव्ह जिहादचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. बरेच राजकीय मंडळी या प्रकरणावर तोंडसुख घेत आहे. तर याच प्रकरणी नवनीत राणा यांनी हिंदू संघटनेच्या काही कार्यकर्त्यांसह थेट राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि मुलीला समोर आणण्याची मागणी करत पोलीसांशी हुज्जत घालायला सुरवात केली. एका मुलीला पळवून तीचा आंतरधर्मीय विवाह केल्याचा आरोप आहे.

Video सौजन्य सोशल मिडिया

या प्रकारानंतर अमरावतीत आणखी एक आंतरधर्मीय विवाह प्रकरण गाजायला सुरवात झाली आहे. नवनीत राणा यांनी म्हटले आहे की, पतीने मुलीला डांबून ठेवल्याची तक्रार घेऊन मुलीचे पालक माझ्याकडे आले. मात्र मी फोन केल्यावर पोलिसांनी माझा फोन रेकॉर्ड केला, तुम्हाला माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार कोणी दिला. असा सवाल करत त्या अमरावती पोलिस ठाण्यात धडकल्या. यादरम्यान पोलिस आणि नवनीत राणा यांच्यात वाद निर्माण झाला. सध्या या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले तसेच पोलीस ठाण्याच्या परीसरात संख्येने गर्दी झाली.

राणा यांनी नंतर स्पष्ट केले आहे की, अमरावतीची बदनामी का होत आहे. 19 वर्षांची हिंदू मुलगी आहे. त्या मुलाला पकडून आणले आहे. रात्रीपासून चौकशी करत आहेत, मात्र काही समोर येत नाही. मात्र मुलगी कुठे आहे याबाबत उत्तरे दिली जात नाहीयेत. त्या मुलाच्या परिवाराला इथे पकडून आणा, एका तासात सगळे बाहेर येईल. दोन तासांत मुलीचा शोध घ्या, असा अल्टिमेटम त्यांनी दिला आहे. या मुलांचा एक समूह आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments