Homeराज्यकिर् र अंधारातही महावितरण कर्मचारी कार्यरत, रात्रीच पोल उभारून ठिक २:२१ वाजता...

किर् र अंधारातही महावितरण कर्मचारी कार्यरत, रात्रीच पोल उभारून ठिक २:२१ वाजता वीज पुरवठा केला सुरळीत…

मान्सुनपुर्व वादळ-वाऱ्याचा महावितरणला फटका…

अमरावती – मान्सूनपुर्व वादळ वाऱ्यामुळे विस्कळीत झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी किर् र अंधारातही महावितरण कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावले.परिणामी अंजनगाव सुर्जी गावठाण वाहिनीवरील वीज पुरवठा अथक परिश्रम करत रात्रीच ११ केव्हीचे नविन पोल उभारून रात्री ठिक २:२१ वाजता  सुरळीत करण्यात महावितरण कर्मचाऱ्यांना यश आले. 

दिनांक ९ व १० जुन रोजी झालेल्या मान्सूनपुर्व वादळ वाऱ्याचा फटका जिल्ह्यातील दर्यापुर ,अंजनगाव व धारणी परिसरात मोठया प्रमाणात बसला आहे. वादळाचा वेग प्रचंड असल्यामुळे अनेक ठिकाणी गावातील टिनपत्रे उडून महावितरणच्या वीज यंत्रणेत अडकली होती.काही ठिकाणी झाडे उन्मळून / झाडाच्या फांद्या तुटून वीज वाहिन्यांवर पडल्याने उच्चदाब व लघूदाब वाहीनीचे दर्यापूर परिसराती ८० वीज खांब तुटले व झुकले आणि ३०० वीज वाहिन्याचे गाळे क्षतीग्रस्त झाले होते.

त्याचबरोबर दिनांक १० जुन रोजी संध्याकाळी ५:३० वाजता झालेल्या वादळवाऱ्याचा परिणाम अंजनगाव सुर्जी परिसरातील ०९  विजेचे खांब व ७ पोलमधील वीज वाहिन्यांचे गाळे क्षतीग्रस्त झाले होते.त्यामुळे धानेगाव,शेलगाव आणि धांडी गावाचा वीज पुरवठा खंडित झाला होता.

पंरतू  सहाय्यक अभियंता सोळंके, मौदेकर ,कनिष्ठ अभियंता राठोडसह कर्मचारी जीवन खरात,अंकुश डुकरे,देवेंद्र बांबल व कत्राटदार जानराव काळे यांच्या मदतीने रात्रीतूनच ११ केव्ही वीज वाहीनीचे नविन पोल उभारले,वाहिनीवरील फॉल्ट शोधला आणि रात्री ठिक २:२१ वाजता धानेगावचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. तसेच शेलगाव आणि धांडी गावाचा वीज पुरवठा आज संध्याकांळपर्यंत सुरळीत करण्यात येणार आहे. 

तसेच १० जुनला संध्याकाळी झालेल्या वादळवाऱ्यामुळे धारणी अंतर्गत सदरावाडी गावालगत ३३ केव्ही गोंडवाडी फीडर चे २ खांब पडल्याने ३३ केव्ही डापका व गोडवाडी सबस्टेशन वरील ३५ पेक्षा जास्त गावांचा वीज पुरवठा बंद पडला होता. परंतू महावितरण कर्मचाऱ्यांना सध्याकाळी अर्ध्यातासातच गोंडवाडी सबस्टेशन चा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले. डाबका सबस्टेशन वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावतरणची यंत्रणा कार्यरत असून आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत डाबका उपकेंद्राचाही वीज पुरवठा सुरळीत होणार आहे. 

 वादळवाऱ्याचा सर्वात जास्त फटका हा दर्यापूर परिसराला बसला.परंतू महावितरण कर्मचाऱ्यांनी तसचे कंत्राटदार एजन्सीच्या मदतीने अथक परिश्रम करत केलेल्या कार्यामुळे दर्यापुर परिसरातील आवश्यक असलेला गावठाण वाहिन्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरण यशस्वी ठरली आहे. कृषी वाहिन्यांचा वीज पुरवठा टप्याटप्याने सुरळीत करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments