Homeराज्यमुदखेड नगरपरिषदेतील मिळकतीची ड्रोनद्वारे होणार मोजणी...

मुदखेड नगरपरिषदेतील मिळकतीची ड्रोनद्वारे होणार मोजणी…

नांदेड – महेंद्र गायकवाड 

महाराष्ट्र शासन महसूल व वनविभागअंतर्गत भूमिअभिलेख विभागाद्वारे राज्यातील 5 नगरपालिका / नगरपरिषद हद्दीतील क्षेत्राचे खाजगी संस्थाद्वारे नगर भूमापन करण्यात येणार आहे. यात पाच नगरपरिषदेमध्ये नांदेड जिल्ह्यातील मुदखेड नगरपरिषदेची पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत निवड करण्यात आली आहे.

यानुसार मुदखेड नगरपरिषदेच्या हद्दीतील मिळकतीचे नगरभूमापन लवकरच सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख सुरेखा सेठिया यांनी दिली. यासाठी लागणारी पूर्व तयारी करण्यात आली असून मुदखेडच्या नागरिकांना त्यांच्या मिळकितीचे कायदेशीर संरक्षण प्राप्त होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे मिळकतीचा नकाशा विहित परिमाणात तयार होईल व सिमा निश्चित होतील. मिळकतीचे नेमके क्षेत्र किती आहे याची नोंद होईल.  

शहरवासीयांचे नागरी हक्काचे संवर्धन व गावातील रस्ते, शासनाच्या, नगरपरिषदेतील खुल्या जागा, नाले यांच्या सिमा निश्चित होवून अतिक्रमण थांबता येणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याचबरोबर मिळकत पत्रिका तयार झाल्याने मिळकत धारकांना घरावर कर्ज कर्ज घेणे सुलभ होईल. नगरपरिषदेची कर आकारणी, बांधकाम परवानगी यासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होईल. या सर्व्हेक्षणासाठी सर्वे करणाऱ्या पथकाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

धर्माबाद नगर परिषदेतील मिळकतीची ड्रोनद्वारे मोजणी

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद नगरपरिषद हद्दीतील क्षेत्राचे नगरभूमापन कामास महसुल व वनविभाग अंतर्गत भूमि अभिलेख खाते व भारतीय सर्वेक्षण विभाग डेहराडून यांच्या  संयुक्त सहभागाने नगर भूमापनचे काम ड्रोनच्या सहाय्याने करण्यात येत आहे. याच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात  करण्यात आली आहे.  

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments