Friday, April 26, 2024
Homeराज्यमुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मुंबई दौऱ्यावर येणार...

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मुंबई दौऱ्यावर येणार आहेत…

Share

मुंबई – मोदींच्या या मुंबई दौऱ्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने बैठक घेत स्वागताची तयारी केली आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मेट्रो स्टेशन आणि बीकेसी मैदानाची पाहणी केली आहे.

तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीसही सज्ज झाले आहेत. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे आज मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे. या कालावधीत घाटकोपर – वर्सोवा मेट्रो काही तास बंद असणार आहे. त्यामुळे विमान प्रवाशांना देखील आज मुंबईतील ट्राफिक लक्षात घेता विमानतळावर वेळेत पोहचण्यासाठी लवकर निघावं लागेल.

दरम्यान VIP मुव्हमेंटमुळे मुंबईच्या रस्त्यांवर आज दुपारी 12 ते रात्री 9 वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद असेल. यात वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, सांताक्रूझ जोगेश्वरी लिंक रोड, ईस्टर्न एक्स्प्रेस रोड आणि इतर रस्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवाशांनी इतर पर्यायी मार्गांचा वापर करावा, कारण अवजड वाहनांना बंदी असली तरी इतर वाहनांची गर्दी वाढणार आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत विमानतळावरून फ्लाईट अससेल्या प्रवाशांना लवकर पोहचावे लागणार आहे.दरम्यान बीकेसी आणि गुंदवली मेट्रो स्थानक येथील नियोजित सार्वजनिक कार्यक्रमामुळे ४.१५ ते ५.३० या वेळेत पश्चिम द्रुतगती मार्गावर दक्षिण वाहिनी (कुलाबाकडे) तसेच ५.३०-.४५ या वेळेत उत्तरवाहिनी (दहिसरकडे) वाहतुक संथ गतीने सुरू असेल, नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी, असं ट्विट मुंबई पोलिसांनी केलं आहे.

यासह नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, वाहतूक विभागाच्या अधिकृत माध्यमांवरून मिळालेली माहिती प्रमाण मानावी, तसेच प्रवाशांना कोणतीही समस्या अथवा शंका असल्यास मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांक किंवा ट्विटरवर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.

हे मार्ग असतील बंद

पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलिंककडून बिकेसी परिसर कुर्लाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना फॅमिली कोर्ट जंक्शनकडून पुढे कुर्ल्याच्या दिशेने जाण्यासाठी प्रवेश बंदी असेल.

संत ज्ञानेश्वर मार्गावरून कुर्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना इन्कम टॅक्स जंक्शनकडून पुढे बिकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाता येणार नाही.

खेरवाडी शासकीय वसाहत कनाकीया पॅलेस, वाल्मिकी नगरकडून पुढे बीकेसी परिसर, चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाता येणार नाही.

सुर्वे जंक्शन आणि रजाक जंक्शनवरुन बिकेसी परिसर, धारावी, वरळी सिलिंकच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना एमटीएनएल जंक्शन येथून प्रवेश बंदी असेल.

संपूर्ण बीकेसी परिसरामध्ये कोणीही त्यांची वाहने कोणत्याही रस्त्यांवर पार्किंग करणार नाहीत.

पर्यायी मार्ग

पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलिंककडून बिकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने एमएमआरडीए जंक्शन येथून धारावी टी जंक्शनवरून कुर्ल्याकडे तसेच पूर्व दृतगती मार्गाकडे मार्गस्थ होतील.

संत ज्ञानेश्वर मार्गावरुन इन्कम टॅक्स जंक्शनकडून पुढे बिकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने.
गुरुनानक रूग्णालयाजवळ जगत विद्यामंदिर जंक्शन येथून कलानगर मार्गे सरळ पुढे धारावी टि जंक्शनवरून.
पुढे कुर्ल्याकडे मार्गस्थ होतील.

खेरवाडी शासकीय वसाहत कनाकीया पॅलेस, वाल्मीकी नगर कडून पुढे बीकेसी परिसर, चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने, वाल्मीकी नगर येथून युटर्न घेवून (खेरवाडी वा. वि. हद्दीत) शासकीय वसाहतमार्गे कलानगर जंक्शन येथून सरळ पुढे धारावी या. वि. हद्दीत टि जंक्शन पुढे वरून कुर्ल्याकडे मार्गस्थ होतील.

पूर्व द्रुतगती महामार्ग, चुनाभट्टीवरून, कनेक्टर मार्गे येणारी वाहने एनएसई जंक्शन, इन्कमटॅक्स जंक्शन, फॅमीली कोर्ट, एमएमआरडीए वरून पुढे मार्गस्थ होतील

सुर्वे जंक्शन आणि रजाक जंक्शनवरुन पश्चिम दृतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलीकच्या दिशेने जाणारी वाहने सुर्वे जंक्शन, रजाक जंक्शन, एमटीएनएल जंक्शन येथुन सिएसटी रोडने मुंबई विद्यापीठ मेनगेट, आंबेडकर जंक्शन, हंसभुग्रा जंक्शन येथून पुढे इच्छीत स्थळी मार्गस्थ होतील

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यादरम्यान MMRDA मैदान आणि मेट्रो 7 गुंदवली आणि मोगरापाडा स्थानकादरम्यान ड्रोन, पॅरारलाईडर आणि रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट उड्डाणास बंदी घातली आहे.

सदर क्षेत्र काल म्हणजे बुधवार पासून उड्डाण प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

याबाबत मुंबई पोलिसांनी आदेश जारी केला आहे.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाच पोलीस उपायुक्त हजर असतील.

त्यांच्या मदतीला 27 एसीपी, 171 पोलीस निरीक्षक आणि 397 अधिकारी हजर असतील.

या संपूर्ण परिसरात बंदोबस्तासाठी अडीच हजार पोलीस अंमलदार हजर असतील.

तर 600 महिला पोलीस अंमलदार हजर असतील.

यासह राखीव पोलीस दलाच्या चार तुकड्या आणि दंगलविरोधी पथकाची एक तुकडी, शिवाय शीघ्र कृती दलही हजर असेल.

स्वत: मुंबई पोलीस आयुक्त बंदोबस्तावर देखरेख ठेवणार आहे.

सोहबत स्पेशल सीपी आणि इतर पोलीस आयुक्त हजर असतील.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: