HomeMarathi News Todayमूर्तिजापूर | दुधलम बाप-लेकाची हत्या प्रकरणात ७ आरोपी अटकेत...तर जुना वादच कारणीभूत...

मूर्तिजापूर | दुधलम बाप-लेकाची हत्या प्रकरणात ७ आरोपी अटकेत…तर जुना वादच कारणीभूत ठरला…

मूर्तिजापूर येथून जवळच असलेल्या व पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दुधलम या गावात काल रात्री ९.३० च्या सुमारास बाप-लेकाची हत्या झाल्याने खळबळ उडाली होती, याप्रकरणी पिंजर पोलिसांनी ७ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर मृतकाची पत्नी हि गंभीर जखमी असून तिला अकोला येथे रुग्णालयात दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील हद्दीतील शेवटचे गाव असलेल्या दुधलम गावात प्रताप पंडित यांचं कुटुंब वास्तव्यास आहे. तर त्यांच्या शेजारीच त्यांचे चुलत भाऊ किशोर पंडित हे राहतात. 2020 मध्ये त्यांच्यात वाद झाला होता तो वाद न्यायालयात सुरु असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी काल एकत्र आले असता बोल्चालीतून आणखी वाद वाढला, वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यानंतर हत्येपर्यंत पोहचले.

या वादात किशोर पंडितसह नातेवाईकांनी प्रताप पंडित आणि पुत्र सुरज पंडित यांच्यावर वार केले. या हल्ल्यात दोघे पिता पुत्र गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झालाय. तर अनिता प्रताप पंडित ह्या गंभीर जखमी झाल्या सोबतच दोन जन जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. काल रात्री साडेनऊच्या सुमारास हे हत्याकांड घडले असल्याचं सांगण्यात येत आहे, या घटनेची माहिती पिंजर पोलिसांना मिळताच त्यांनी लागलीच घटनास्थळ गाठले.

याप्रकरणी पिंजर पोलिसांनी गुन्हा दाखल करून किशोर पंडितसह ७ आरोपींना ताब्यात घेतले आहेत. पोलीस पुढील तपास पिंजर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय वाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments