Homeराज्यनरखेड | मोवाड पांढुर्णा रस्त्यावर जीवघेणे खड्डे, न.प. माजी उपाध्यक्ष रवि वैद्य...

नरखेड | मोवाड पांढुर्णा रस्त्यावर जीवघेणे खड्डे, न.प. माजी उपाध्यक्ष रवि वैद्य यांनी केली तात्काळ काम सुरु करण्याची मागणी…

नरखेड – अतुल दंढारे

नरखेड तालुक्यातील मोवाड शहर हे नागपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर आणि मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर वसलेले इंग्रज राजवटीतील सन 1867 मध्ये स्थापन झालेले महाराष्ट्रातील एकमेव नगरपरिषद म्हूणन मोवाड शहर चर्चत आहे.

महाराष्ट्र च्या उत्तर सीमेला मध्यप्रदेश राज्य असून मध्यप्रदेशमधील प्रवासी वाहतूक मोवाड पांढुर्णा रस्त्यावरुन रात्रदिवस आवागमन करीत असतात. मोवाड शहरातील शेतकरी वर्ग ही याच रस्त्याचा वापर करतात पण या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठंमोठे जीवघेणी खड्डे पडले आहेत.

या खड्ड्यामध्ये पाणी साचले असल्याने पाण्याचा अंदाज वाहकांना समजू शकत नाही त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही या खड्ड्यामधून वाहने उसळून अपघात होत असल्याचीही चर्चा शहरात आहेत रस्त्याच्या नवीनीकरणाला मंजुरी मिळून अनेक वर्ष झालीत कामाचे टेंडर पास होऊन ठेकेदारानी काम घेतल्याचे ही चर्चा आहेत.

पण अजून पर्यंत कामाला सुरुवात झालेली नाही. रस्त्यावर काहिना का असो दिवे असणे आवश्यक आहे पण रस्त्यावर दिवेची सुविधा उपलब्ध नाही शेतकरी व वाहक रात्रीच्या वेळी आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत असतो.

रस्त्याच्या नवीनीकरणाचे काम तात्काळ सुरु करावे अशी मागणी मोवाड नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष रवि वैद्य, माजी अध्यक्ष पुरुषोत्तम बागडे, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक दिपक बेले आदीनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. 2 नागपूर यांच्याकडे केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments