Homeगुन्हेगारीनंदेमध्ये आजाराच्या त्रासाला कंटाळून महिलेची नदीत उडी मारून आत्महत्या...

नंदेमध्ये आजाराच्या त्रासाला कंटाळून महिलेची नदीत उडी मारून आत्महत्या…

महेंद्र गायकवाड
नांदेड

नांदेड शहरातील सिडको भागातील गोपाळचावडी येथे किरायाने राहत असलेले व नविन् मोंढा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील तपासणी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले घनश्याम कदम यांच्या पत्नी सौ.सुनीता घनश्याम कदम यांनी आजाराच्या त्रासाला कंटाळून नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून जीव रक्षक दल बोटद्वारे शोध घेत आहे.

सिडको भागातील गोपाळचावडी येथे किरायाने राहत् असलेले नवीन मोंढा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील तपासणी अधिकारी घनश्याम कदम यांचे नवीन घराचे बांधकाम चालू होते.अशातच त्यांच्या पत्नीला आजार जडला होता.

या आजराला कंटाळून त्यांनी आज दिनांक 19 ऑगस्ट रोजी नदीत उडी मारून् आत्महत्या केली.त्यांच्या मुलगा सुद्धा बँकेत नोकरीलाअसुन् मुलगा व मुलगी विवाहित असल्याचे समजते.सर्व सुख सुविधा असून सुद्धा केवळ आजारामुळे या महिलेने आत्महत्या केल्याचे कळते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments