HomeFeaturedराज्यशालेय सुब्रतो जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत नव कृष्णा व्हॅली स्कूलला विजेतेपद...

शालेय सुब्रतो जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत नव कृष्णा व्हॅली स्कूलला विजेतेपद…

सांगली – ज्योती मोरे

सांगली जिल्हा क्रीडा कार्यालय मार्फत जिल्हास्तरीय सुब्रतो फुटबॉल स्पर्धा दिनांक 26 व 27 जुलै 2022 रोजी क्रीडा संकुल मिरज येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील स्कूल सहभागी झाले होते.

14 वर्षाखालील मुलांच्या वयोगटांमध्ये नव कृष्णा व्हॅली स्कूल ला उपविजेतेपद पटकावले. तर 17 वर्षाखालील वयोगटांमध्ये मुलांच्या फुटबॉल स्पर्धेमध्ये विजेतेपद प्राप्त केले व सदर संघाची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे.त्यांना प्रशिक्षक म्हणून अश्रफ शेख यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

सुरज फौंडेशन संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रवीण जी लुंकडव,सचिव एन जी कामत,त्याचबरोबर नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यमच्या प्राचार्य व संचालिका सौ संगीता पागनीस, उपप्राचार्य प्रशांत चव्हाण,सुरज स्पोर्ट्स अकॅडमीचे सचिव विनायक जोशी, त्याचबरोबर नव कृष्णा व्हॅली स्कूलचे फिजिकल टीचर सुशांत सूर्यवंशी व नामदेव नलवडे यांचे त्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments