Homeराज्यनिलेश राठीच्या भू घोटाळ्याला पालीकेपाठोपाठ भूमी अभिलेखनेही स्विकारले, पण योग्य कार्यवाही करणे...

निलेश राठीच्या भू घोटाळ्याला पालीकेपाठोपाठ भूमी अभिलेखनेही स्विकारले, पण योग्य कार्यवाही करणे मात्र दोघानीही नाकारले…

संजय आठवले – आकोट

आकोट पालीकेच्या पश्चिमेकडे ऊभारण्यात आलेल्या साई रेसीडेन्सी या ईमारतीचे जागेबाबत भू घोटाळा झाल्याचे पालीकेपाठोपाठ भूमी अभिलेख कार्यालयानेही मान्य केले आहे. तथापी या संदर्भात अनेक तक्रारी झाल्यावरही केवळ आपल्या प्रचंड क्षिज्ञानाच्या साठ्याचे व आपल्या वरपांगी कर्तव्यनिष्ठतेचे तकलादू प्रदर्शनाखेरिज या दोन्ही कार्यालयानी साई रेसीडेन्सी ईमारत व या ईमारतीचे भूखंड यांचेबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. हे प्रकरण सुरु झाल्यापासून वर्तमान समयापर्यंत आकोट पालीका व भूमी अभिलेख कार्यालयात अनेक अधिकारी येवून गेलेत. परंतु या प्रकरणी पत्रप्रपंचाखेरिज अन्य कार्यवाहीसाठी कुणीही कोणतेही पाऊल पुढे टाकलेले नाही.

आकोट शहरातील न.शि.क्र. १० प्लॉट क्र. १५ या जागेवर निर्माणाधिन साई रेसीडेन्सी या ईमारतीसंदर्भात व या ईमारतीचे जागेसंदर्भात आकोट पालीका व भूमी अभिलेख कार्यालयाकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्या अनुषंगाने आकोट पालीका अभियंत्याने साई रेसीडेन्सीचे बांधकाम तळमजल्यावरुन संपून पहिल्या माळ्यावर सुरु असताना आपला अहवाल सादर केला.

या अहवालात पुढिल बाबी स्पष्ट करण्यात आल्यात. केशव गावंडे नामक ईसमाकडे शासनाच्या भूसंपादनानंतर केवळ ९.६४ चौ.मी. जागा असताना निलेश राठीने ६३.९८ चौ.मी. जागा खरेदी केली. साई रेसीडेन्सीचे बांधकाम तिन भूखंडावर होत असुन नियमानुसार त्यांचे एकत्रिकरण करण्यात आलेले नाही.

या बांधकामानजिक असलेल्या नझूलच्या प्लॉट क्र. ४ वर कब्जा करण्यात आला आहे. तळमजल्यावर १६२.०४ व प्रथम माळ्यावर ३५५.८१ चौ.मी. अवैध बांधकाम केलेले आहे. याची चौकशी भूमी अभिलेखद्वारे करण्याची आवश्यकताही या अभियंत्याने प्रगट केली.

तथापी या अहवालावर दि. २८.८.२०१४ निलेश राठीचे नावे केवळ नोटीस तयार करण्यात आली. त्यावर तत्कालीन मुख्यअधिकारी समीर लाठी यानी ना स्वाक्षरी केली ना ती नोटीस राठीला पाठविली गेली. त्यानंतर अनेक मुख्यअधिकारी आलेत. परंतु राठी प्रकरणाच्या गाठी एकानेही ऊकलल्या नाहीत.

असाच प्रकार भूमी अभिलेख कार्यालयानेही केला. या ईमारतीच्या तक्रारीबाबत आकोट ऊपविभागीय अधिकारी याना तत्कालीन उपअधिक्षक भूमी अभिलेख योगेश कुळकर्णी यानी अहवाल दिला. दि. ९.४.२०१५ रोजीच्या या अहवालात त्यानी आपल्या बूद्धीचा कस लावून ह्या ठिकाणी भूखंड गडबड झाल्याचे व त्यासंदर्भात कमीजास्त पत्रकाचा अमल करणे आवश्यक असल्याचे मान्य केले. परंतु केशव गावंडे व निलेश राठी यांचे दरम्यान झालेल्या बनावट क्षेत्राच्या खरेदीचा ऊल्लेख मात्र त्यानी सफाईने टाळला. त्याऐवजी पालीकेने आपले क्षेत्राबाबत योग्य दखल न घेतल्याचा आरोप करुन त्यानी सारे खापर पालीकेच्या डोक्यावर फोडले.

त्यानंतर याच ईमारतीबाबत झालेल्या दुस-या तक्रारीवर अकोला अधिक्षक भूमी अभिलेख याना याच योगेश कुळकर्णी यानी दि. २४.३.२०१७ रोजी अहवाल दिला. या अहवालातही त्यानी निलेश राठीच्या ६३.९८ चौ.मी. क्षेत्राचा ऊल्लेख केला मात्र ते चुक कि बरोबर याचा ऊल्लेख सफाईने टाळला. परंतु या प्रकरणाशी तक्रारकर्त्याचा काही संबंध नसल्याचे मात्र त्यानी आवर्जुन नमुद केले.

वास्तविक अखिल भारतात जिथे कुठे ज्या कुणालाही जे अवैध आढळत असेल त्याची माहिती त्याचेशी संबंधित यंत्रणेला देणे हे जागरुक नागरिकाचे कर्तव्य आहे. परंतु कुणी असे केल्याने त्या अवैध कामाशी संबंध असणा-या अधिका-याना अशा जागरुक नागरीकांची अडचण होते. अशावेळी तक्रारकर्त्याचा ह्या बाबीशी संबंध नसल्याचे वरिष्ठाना कळविले जाते. हा संकेत ओळखून मग वरिष्ठ या तक्रारीची धार बोथट करुन टाकतात.

अर्थात ती धार बोथट करणारे साहित्य वरिष्ठाना ईमाने ईतबारे पोचविले जाते. तोच फंडा कुळकर्णीनी ईथे वापरला.ह्यासोबतच कुळकर्णी यानी आपल्या पूर्वीच्या अधिका-यांवरही शरसंधान केले. गावंडे यानी राठीला लिहून दिलेल्या खरेदीखतात ” पालीकेने घेतलेली जागा सोडून घेतलेली ऊर्वरित जागा” असा ऊल्लेख आहे. त्या आधारे याठिकाणी भूसंपादन झाल्याचे लक्षात येते.

त्यामूळे निलेश राठीचे बनावट क्षेत्राची नोंद करताना तत्कालीन भूमी अभिलेख अधिका-यानी काळजी घेतली नसल्याचे त्यानी या अहवालात म्हटले. दि. ९.४.२०१५ च्या अहवालाप्रमाणेच त्यानी या अहवालातही या ठिकाणी झालेल्या घोळासाठी आकोट पालीकेलाच जबाबदार धरले. त्यानंतर ह्या अहवालाशी संबंधित तक्रारकर्त्याने कूळकर्णिंचे मागे लकडा लावल्याने त्यानी निलेश राठीचे लिहिल्या गेलेले बनावट क्षेत्र दुरुस्त करण्यासाठी दि. ३१.०५.२०१७ रोजी विशेष भूमि संपादन अधिकारी, अकोला याना पत्र दिले.

त्यामध्ये त्यानी १९८९ मध्ये झालेल्या भूसंपादनासंदर्भात कमी जास्त पत्रक करणेसाठी आदेशाची मागणी केली. त्यावर विशेष भू संपादन अधिकारी अकोला यानी आकोट उपअधिक्षक भूमि अभिलेख याना दि.२.१२.२०१७ रोजी खरमरित पत्र लिहून तब्बल २८ वर्षानंतर कजापकामी आदेश मागीतल्याबद्दल धारेवर धरले. त्यावर तक्रारकर्त्याने प्रकरणाचे गांभिर्य त्याना अवगत केल्यावर दि. ११.०१.२०१८ रोजीचे पत्रान्वये विशेष भूसंपादन अधिकारी यानी निलेश राठीचे बनावट क्षेत्र नोंदीत दुरुस्ती करणेसाठी कजाप करण्याची परवानगी दिली.

या आदेशामूळे साई रेसीडेन्सी ईमारतीच्या बनावट क्षेत्रात दुरुस्ती करण्यास कोणतीही अडचण नव्हती. परंतु निलेश राठीच्या स्नेह वर्षावाने नखशिखान्त चिंब होऊन भावविभोर झालेल्या आकोट उपअधिक्षक भूमि अभिलेख योगेश कुळकर्णी यानी आपले स्थानांतरण होईपर्यंत ह्या आदेशाची अमलबजावणी केली नाही.

त्यानंतर विशेष भू संपादन अधिकारी यांनी कजापकामी दिलेल्या या आदेशाचे स्मरण नव्याने आलेल्या श्री. परतेती याना करवून देण्यात आले. त्यावर त्यानी आदेश दिलेले काम करण्याऐवजी कामाचा पसारा वाढवून आपल्या अकलेचे घोडे दौडविले. त्यानी विशेष भूसंपादन अधिकारी, अकोला याना दि. ३.५.२०१८ रोजी पत्र देवून ” हे कजाप क्षेत्र दुरुस्तीखेरिज होऊ शकत नाही. त्यामूळे तसा प्रस्ताव ऊपविभागीय अधिकारी आकोट याना देण्यात आल्याची माहीती त्याना दिली.

दि. २२.०६.२०१८ रोजीच्या या प्रस्तावाचे अवलोकन केले असता फारच कमी वेळात परतेती हे निलेश राठीच्या स्नेहरज्जूनी बांधल्या गेल्याचे निदर्शनास येते. त्यानी या पत्रात म्हटले आहे कि, ” सन १९८७ मध्ये भूसंपादन झालेल्या प्रकरणातील अवार्ड व ईतर कागदपत्रांचे अवलोकन केले असता, सदर भूसंपादन संस्था न.प. आकोट ही होती. व तत्कालीन भू संपादन अधिकारी मा. उपजिल्हाधिकारी अकोला हे असलेने अवार्ड व भूसंपादन कार्यवाही त्यांचे कार्यालयाकडून झालेली असलेने विषयांकित कामी कजाप करणे कामी अवार्ड व आदेशाची प्रत पुरविणेबाबत ईकडिल कार्यालयाचे पत्र दि. ३१.०५.२०१७ अन्वये त्यांचेकडे करण्यात आली आहे. परंतु सदर कागदपत्रे या कार्यालयास प्राप्त झालेले नाहीत”.

आपल्या या कथनात परतेतीनी ऊल्लेख केलेले दि. ३१.०५. २०१८ च्या ह्या पत्राचे अवलोकन केले असता ध्यानात येते कि, आकोट कार्यालयाने विशेष भू संपादन अधिकारी याना केवळ कजापच्या आदेशाखेरीज अन्य कोणत्याही कागदांची मागणी केलेली नाही. ऊलट या संदर्भात सारी कागदपत्रे आपल्या कार्यालयाकडून आपण मिळविलेली असल्याचे या पत्रात म्हटले आहे. या शिवाय परतेतीनी आपल्या पत्रात, “सन १९८७ मध्ये भूसंपादन झालेल्या प्रकरणातील अवार्ड व ईतर कागदपत्रांचे अवलोकन केले असता” असे म्हटले आहे.

यावरुन परतेती हे खोटे बोलत असुन ज्या कागदपत्रांची मागणी केल्याचे ते सांगतात ती कागदपत्रे आधीच आकोट कार्यालयात ऊपलब्ध होती.आणि त्यांचेच अवलोकन करुन तीच कागदपत्रे आपल्याकडे नाहीत असे धादांत खोटे कथन त्यानी उपविभागीय अधिकारी यांचे पत्रात केले. यावरुन परतेती याना ही कजाप कार्यवाही करायचीच नसल्याचे ध्यानात येते. पुढे त्यानी आपल्या पत्रात, साई रेसीडेन्सी बांधलेल्या ठिकाणी तब्बल १३६.९ चौ.मी. चा घोळ असल्याने याठिकाणी क्षेत्रदुरुस्तीचा आदेश देण्याची विनंती उपविभागिय अधिकारी आकोट याना केली.

त्यावर दि. ३०.५.२०१९ रोजी तत्कालीन उपविभागीय अधिकारी सिद्धभट्टी यानी परतेती याना ” कजापचे आदेश यापूर्वीच आपणास दिले” असल्याचे सांगून या परिसरातील प्रत्येक प्लॉटची मोजणी करुन ती मोजणी शिट व सुधारीत अभिन्यास तयार करुन प्रस्ताव पाठविल्यास क्षेत्र दुरुस्तीसाठी तो प्रस्ताव ऊपसंचालक भूमी अभिलेख अमरावती यांचेकडे पाठविता येईल त्यामूळे प्रस्ताव सादर करण्यास फर्मावले. या आदेशानंतर अखेर परतेती बदलून गेले परंतु ना कजाप झाले ना दुरुस्ती झाली ना प्रस्ताव तयार झाला. सगळीकडे अगदी निरव शांतता.

ह्यावरुन ध्यानात येते कि, साई रेसीडेन्सीच्या बांधकामातील व जागेबाबतचा घोळ तत्कालीन उपविभागीय अधिकारी, न.प. मुख्याधिकारी, उपअधिक्षक भूमि अभिलेख या सा-याना ठाऊक होता. नविन आलेल्यानाही ठाऊक होता. परंतु त्यातील एकानेही शासनाची जागा वाचविण्याची, सत्य ऊघडकिस आणण्याची अथवा आपले कर्तव्य चोख बजावण्याची तसदी घेतली नाही. ऊलट सगळीकडे ढकलाढकली आणि राठीनिष्ठा दाखविण्याचीच स्पर्धा चालत आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments