Homeराज्यनिर्मला यादव यांना पुन्हा एक आदर्श शिक्षक पुरस्कार...

निर्मला यादव यांना पुन्हा एक आदर्श शिक्षक पुरस्कार…

कागल, प्रतिनिधी…
शिक्षक हा देशाचा कणा असुन शिक्षकांनी उत्तम केलेल्या अद्यापणामुळेच देशाच उज्वल भविष्य असत.एखाद्या शाळेतील कोणताही शिक्षकाला चांगले अद्यापण केल्यामुळे शासनाकडून आणि सामाजिक संस्थेकडून त्यांची दखल घेऊन आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो.असाच बहुमान गेल्या काही वर्षांत शैक्षणिक क्षेत्रात प्रामाणिक काम करणाऱ्या व श्री दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व्हन्नुर ता.कागल येथील सहाय्यक शिक्षिका सेवा बजावणाऱ्या निर्मला चंद्रकांत यादव यांना पुन्हा एकदा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे.

ज्ञानजोती सामाजिक सेवाभावी संस्था, सोलापूर यांच्या वतीने जोती खिल्लारे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे.हा सोहळा कोल्हापूर येथील हाँटेल अँट्रीया येथे पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभय भोर हे होते.या केलेल्या सन्माना बद्दल यादव यांनी कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रकाश कदम सर,सुमित्रा पाटील,दत्तात्रय पाटील,चंद्रकांत टक्कर,डॉ.सुरेश कराडे,चंद्रकांत सावंत ,निरंजन कांबळे,सियज शिकलकार,स्वाती कांबळे,राजु किचडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजक डॉ.विक्रम शिंगाडे हे होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments