Thursday, May 2, 2024
Homeराजकीयईशान्य मुंबई होणार अधिक गतिमान खासदार मनोज कोटक यांनी केली विक्रोळी रेल्वे...

ईशान्य मुंबई होणार अधिक गतिमान खासदार मनोज कोटक यांनी केली विक्रोळी रेल्वे ओव्हर ब्रिज आणि डि पी रस्त्यांची पाहणी…

Share

मुंबई – धीरज घोलप

रेल्वे मार्गामुळे विभागलेल्या पूर्व आणि पश्चिम परिसरांना रस्ते मार्गाने जोडण्याचे जोरदार प्रयत्न भाजप खासदार मनोज कोटक यांनी केले आहेत त्यामुळे ईशान्य मुंबई अधिक गतिमान होणार आहे. खासदारांनी केलेल्या प्रयत्नातून नुकतेच भांडुप येथे रेल्वे ओव्हर ब्रिजला (पूल) मंजुरी मिळाली आहे तसेच बुधवारी सायंकाळी खासदार मनोज कोटक यांनी विक्रोळी रेल्वे ओव्हर ब्रिज आणि डि पी रोडच्या कामांची पाहणी केली.

यावेळी कंत्राटदार, पालिका अधिकारी, रेल्वे अधिकारी उपस्थित होते. कंत्राटदार आणि अधिकार्याकडून पूलाच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर पूलाच्या कामाला अधिक गती देण्याच्या सूचना खासदार मनोज कोटक यांनी केल्या.विक्रोळी पूर्वकडील पूलावरील गर्डर येत्या महिनाभरात टाकण्यात येतील आणि वर्षभरात म्हणजे डिसेंबर 2023 पर्यंत हा पूल वाहतूकीसाठी खुला होईल, अशी माहीती देण्यात आली.

2018 साली विक्रोळी रेल्वे ओव्हर ब्रिजच्या (पूल) कामाला सुरुवात झाली. माञ परिस्थितीनुसार पूलाच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आले त्यामुळे पूलाच्या निर्मितीत विलंब झाला. 12 मीटर रूंद या पूलाची एकूण लांबी 615 मीटर आहे. यातील अरध्याहून अधिक 350 मीटरचा भाग विक्रोळी पूर्व भागात असून 50 मीटर रेल्वे हद्दीत तर 215 मीटरचा भाग विक्रोळी पश्चिमेला आहे. सध्यस्थितीत पूलाचे सर्व 19 पिलर उभारण्यात आले असून पुढील टप्प्यात गर्डर टाकण्याचे काम होणार आहे. या पूलाचे काम जलदगतीने व्हावे आणि विक्रोळीकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी भाजप खासदार मनोज कोटक यांनी केलेल्या पाहणी दौर्याबद्दल विक्रोळीकरांनी समाधान व्यक्त केले आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: