कागल – राहुल मेस्त्री
हे पुतळ्यांचे नाही तर विचारांचे अनावरण आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध सिनेअभिनेते व सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांनी कागल येथे जोतिबा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर ,आण्णाभाऊ साठे आणि महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यांचे अनावर प्रसंगी समतेचा जागर या कार्यक्रमात ते बोलत होते.
ते बोलताना पुढे म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवणे जरी सोप असले तर त्यांचे विचारावर चालणे महत्त्वाचे आहे. त्यांचे कार्य फक्त दलितांच्या साठीच मर्यादित नसून सर्वांसाठी आहे असे त्यांनी सांगितले .ते पुढे बोलताना म्हणाले पुतळ्याचे रक्षण करण्यापेक्षा पुतळा बसवलेल्या महामानवांच्या विचारांचे रक्षण करण्याची गरज असून समाज भिमुख काम पहायचे असेल तर आजचा हा कार्यक्रम त्यांचे उदाहरण आहे.
हसन मुश्रीफ यांना येणाऱ्या निवडणूकीत प्रचार करण्याची गरज नाही.कारण त्यांच्या विरुद्ध कोण निवडणूक येऊ शकणार नाही असे त्यांचे काम आहे असे मनोगत अभिनेते नाना पाटेकर यांनी केले..प्रारंभी स्वागत माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने यांनी केले.यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नाना पाटेकर यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला..
यावेळी हसन मुश्रीफ बोलताना म्हणाले दहा वर्षांपूर्वी एका कामात नाना पाटेकर आणि माझी ओळख झाली होती. मी त्यांना वचन दिले होते कागल मध्ये राजकीय नव्हे तर सामाजिक कार्यक्रमात आमंत्रण देईन .नाना पाटेकर हे अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या तोडीचे अभिनेते आहेत असे त्यांचे कौतुक केले.पुढे ते बोलताना म्हणाले कागल ही शाहू महाराज यांची भुमी असुन खुप कमी कालावधीत त्यांचे खुप मोठे काम आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी त्यांनी मदत केली आहे.
त्याचबरोबर माणगाव येथे अस्पृश्य सभा घेतली.आणि बाबासाहेबांनी शिक्षण घेऊन जगातील सर्वात मोठी लिखित देशाची राज्य घटना लिहिली.असे त्यांनी मनोगत.केले.यावेळी त्यांनी नाना पाटेकर यांचे गाजलेले डाँयलाँग सादर केले.या कार्यक्रमात छत्रपती मालोजीराजे,आण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे,खास.धैर्यशिल माने,राज्य मंत्री राजेंद्र यड्रावकर,खास.संजय मंडलिक यांनीही मनोगते व्यक्त केली.
याप्रसंगी व्यासपीठावर आम.प्रकाश आबिटर,आम.राजु आवळे,आम.पी एन पाटील,आम.जयश्री जाधव,आम.राजेश पाटील,माजी आम.सुजित मिणचेकर,माजी आम.संजय घाडगे,माजी आम.राजीव आवळे ,माजी आम.संध्यादेवी कुपेकर,मानसिंगराव गायकवाड,युवराज पाटील,आरपीआय जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्यासह अनेक नेते मंडळी ,कार्यकर्ते व जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते.