Homeगुन्हेगारीआकोट मधील कुख्यात गुंड MPDA अ‍ॅक्ट अन्वये एक वर्षाकरीता स्थानबध्द...

आकोट मधील कुख्यात गुंड MPDA अ‍ॅक्ट अन्वये एक वर्षाकरीता स्थानबध्द…

आकोट शहरातील गवळीपुरा येथे राहणारा कुख्यात गुंड अजय नागोराव वैद्य, वय ४८ वर्षे, याचे वर यापुर्वी जबरी चोरी करणे, अवैधरित्या शस्त्र बाळगणे, तडीपारी आदेशाचे उल्लंघन करणे, खंडणीची मागणी करणे, रस्ता अडवून, शिवागाळ करुन मारण्याची धमकी देणे, पैश्याची मागणी करणे, चोरी करणे, जबरदस्ती गृह प्रवेश करणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत.

त्याच्या वर यापुर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाहीसुद्धा करण्यात आली होती. परंतु तो ही कार्यवाही करून सुध्दा जुमानत नसल्याने त्याचे विरुध्द गंभीर दखल घेण्यात आली. ह्या कुख्यात गुंडाचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता पोलीस अधीक्षक, अकोला यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी, अकोला यांना सादर केला होता. त्यावर जिल्हादंडाधिकारी, नीमा अरोरा यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःचे स्त्रोताव्दारे माहीती मिळवुन सदर कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास एकवर्षा करीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश दि. २५/०७/२०२२ रोजी पारीत केला.

या आदेशावरून अजय नागोराव वैद्य याचा तात्काळ शोध घेण्यात आला. त्यास सदरचा आदेश तामील करून दिनांक २५/०७/२०२२ रोजी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले आहे.
सदरची कार्यवाही पुर्ण करण्याकरीता पोलीस अधीक्षक, जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, मोनिका राउत, तसेच सहायक पोलीस अधीक्षक, आकोट उप विभाग, आकोट, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, पोहेकॉ मंगेश महल्ले, यांनी तसेच पो.स्टे. आकोट शहर पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, सर्व कर्मचारी, यांनी परिश्रम घेतले.

अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता रहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणार्या सराईत गुन्हेगारांची माहीती संकलीत करण्यात आली असुन त्यांचे विरुध्द एम.पी.डी.ए. अ‍ॅक्ट खाली कार्यवाही प्रस्तावीत करण्यात आली आहे. माहे जुलै २०२० ते जुलै २०२२ या कालावधी मध्ये एमपीडीए कायद्यान्वये एकुण ७२ गुन्हेगारांवर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments