Homeराज्यओकिनावा ऑटोटेकद्वारे 'मेगा फॅक्टरी'च्या उद्घाटनाची घोषणा...

ओकिनावा ऑटोटेकद्वारे ‘मेगा फॅक्टरी’च्या उद्घाटनाची घोषणा…

भारतात पहिल्यांदाच परिपूर्ण ईव्‍ही इकोसिस्टिम निर्माण करण्याचा मनसुबा

ओकिनावा ऑटोटेक या भारतातील इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री करणा-या पहिल्या क्रमांकाच्या ब्रॅण्डने करोली, राजस्थान येथे त्यांच्या मेगा फॅक्टरीच्या उद्घाटनाची घोषणा केली आहे. ही फॅक्टरी सर्वात सर्वसमावेशक युनिट्सपैकी एक असेल आणि इलेक्ट्रिक दुचाकी कंपनीने देशामध्ये केलेला असा पहिलाच प्रयत्न असेल.

मेगा फॅक्टरीमध्ये अत्याधुनिक उत्पादन सुविधा असतील, जे देशामध्ये एकीकृत ईव्ही इकोसिस्टिम निर्माण करण्याच्या दिशेने लक्षणीय पाऊल आहे. राजस्थानमधील त्यांच्या दोन विशाल फॅक्टरींनंतर हे कंपनीचे तिसरे प्लाण्ट आहे. ही मेगा फॅक्टरी ३० एकर विस्तृत जागेवर पसरलेली असेल आणि ५००० हून अधिक व्यक्तींना रोजगार देईल.

हा भारतातील सर्वात मोठा, पूर्णत: एकीकृत इलेक्ट्रिक दुचाकी प्लाण्ट असेल. या फॅक्टरीमध्ये ५०० कोटी रूपयांची मोठी गुंतवणूक करण्यात येईल. ही मेगा फॅक्टरी ऑक्टोबर २०२३ पासून पूर्णपणे कार्यान्वित होईल.

मेड इन इंडिया आणि मेड फॉर इंडिया या दृष्टीकोनासह हा प्लाण्ट इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादनासाठी पूर्णपणे ऑटोमेटिक, तसेच पॉवरट्रेन उत्पादनासाठी ऑटोमेशन असेल. या प्लाण्टमध्ये इन-हाऊस ऑटोमॅटिक रोबोटिक बॅटरी उत्पादन युनिट, तसेच इन-हाऊस मोटर व कंट्रोलर प्लाण्ट असेल. तसेच उत्पादन प्रक्रियेमध्ये स्थानिकीकरणाची सुविधा देण्यासाठी प्लास्टिक बॉडी पार्टस मोल्डिंगचे रोबोटिक ऑटोमेशन आणि अत्याधुनिक पेंट शॉप देखील असेल. तसेच या मेगा प्लाण्टच्या माध्यमातून हा दर्जा कायम राखला जाईल.

ओकिनावा ऑटोटेकचे संस्थापक व व्‍यवस्थापकीय संचालक श्री. जीतेंदर शर्मा म्हणाले, “इलेक्ट्रिक दुचाकी विभागामधील बाजारपेठ अग्रणी म्हणून आम्ही विभाग सामना करत असलेल्या सर्वात लक्षणीय समस्यांचे निराकरण करण्याप्रती कटिबद्ध आहोत.

मेगा फॅक्टरीमध्ये नियोजित आरअॅण्डडी सुविधा भविष्‍यवादी असतील आणि आम्ही विभागाच्या भावी मागण्यांची पूर्तता करण्याची खात्री घेऊ. मेगा फॅक्टरी वाहनांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्यासोबत त्यामध्ये सप्लायर पार्क देखील असेल, जे परिपूर्ण ईव्ही इकोसिस्टिमला साह्य करण्याकरिता मोटर, कंट्रोलर्स, बॅटरी पॅक्स आणि इतर इलेक्ट्रिकल पार्टसची जबाबदारी घेईल.”

फॅक्टरी देशातील इलेक्ट्रिक दुचाकींसाठी मागणीमधील अभूतपूर्व वाढीची पूर्तता करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. ही फॅक्टरी ओकिनावाला विभागातील अग्रणी म्हणून स्थित करेल आणि उत्पादनामध्ये वाढ करत इलेक्ट्रिक वाहनांसाठी वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासोबत संपूर्ण विभागामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी आरअॅण्डडी सुविधेची सुधारणा, वेअरहाऊस व सप्लायर पार्क अशा आवश्‍यक असलेल्या नवोन्‍मेष्‍कारावर लक्ष केंद्रित करेल. हा मेगा प्लाण्ट जागतिक भावी उत्पादनांची निर्मिती करेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments