Homeराजकीयमहागाई विरोधात युवक राष्ट्रवादी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने '५० खोके महागाई एकदम...

महागाई विरोधात युवक राष्ट्रवादी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने ‘५० खोके महागाई एकदम ओके’ आंदोलन…

महागाई प्रश्नी केंद्र सरकारचा निषेध जोरदार घोषणाबाजी

सांगली – ज्योती मोरे

प्रचंड वाढलेल्या महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून महाराष्ट्रात सर्वत्र आंदोलन करण्यात येत आहे.आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली शहर-जिल्ह्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. महागाई वाढविणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारचा धिक्कार असो, ५० खोके महागाई एकदम ओक्के,महागाई कशासाठी आमदार खरेदीसाठी,जनता भरते जीएसटी आमदार जातात गुवाहाटी,महागाईने दुखते डोके गद्दारांना पन्नास खोके,

अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकत युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना युवक राष्ट्रवादी शहर-जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार म्हणाले की, जीवनावश्यक वस्तू, खाण्याचे पदार्थ, पेट्रोल डिझेल ,गॅस यासह शेकडो वस्तूंच्या झालेल्या भरमसाठ दरवाढीने सर्वसामान्य माणूस शेतकरी कष्टकरी माता भगिनींचे दैनंदिन जगणे असह्य बनले आहे.

आपल्याच धुंदीत वावरणार्‍या उद्योगपती धार्जीण्या भाजपाच्या मोदी सरकारने या प्रचंड महागाईला पुरकच पावले टाकली आहेत. अनेक शासकीय संस्था मोडीत काढणाऱ्या या सरकारने लाखो रोजगार संपुष्टात आणले आहे. हजारो कोटींची उदयोगपतींची कर्जे माफ करणाऱ्या भाजपा सरकारने सर्वसामान्यांकडे मात्र डोळेझाकच केली आहे.

देशातील जनतेला अच्छे दिनची स्वप्ने दाखवुन सत्तेवर बसलेल्या भाजप केंद्र सरकारने देशातील जनतेचा पूर्ण भ्रमनिरास केला आहे.देशातील जनतेला युवकांकडून मोठ्या अपेक्षा आहेत.या आंदोलनाच्या रेट्याने भाजपला महागाई कमी करण्यास भाग पाडूया,तरच युवकांची ताकद या सत्ताधाऱ्यांना समजणार आहे.

यावेळी बोलताना शहर-जिल्हाध्यक्ष संजय बजाज म्हणाले की,केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेच्या अडचणींचा अंत न पाहता लवकरात लवकर सर्व वस्तूंच्या किंमती कमी कराव्यात अन्यथा राष्ट्रवादी युवककडून पुन्हा जोरदार आंदोलन उभारले जाईल असे सांगितले.

यावेळी असिफ बावा , हरिदास पाटील,धनंजय पाटील ,वंदना चंदनशिवे , महंमद मनेर समीर कुपवाडे , महालिंग हेगडे , संदीप व्हनमाने , सुनील भोसले , अक्षय अलकुंटे , साकीब पठाण , उत्तम कांबळे , डॉ शुभम जाधव गॅब्रियल तिवडे , अर्जुन कांबळे , वाजीद खतीब ,सुरेखा सातपुते ,रुपाली कारंडे , छाया पांढरे,सुनीता जगधने,संगीता जाधव ,उमर गवंडी ,डॉ सतीश नाईक , संदीप दळवी , मुन्ना शेख , आदित्य नाईक , धर्मेंद्र कोळी , पप्पू कोळेकर ,अजित दुधाळ ,

अरुण चव्हाण ,सुशांत काळे ,युसुफ जमादार , कुमार वायदंडे ,सुमुख पाटील , सोमनाथ सूर्यवंशी , पिंटू माने ,सनी गाडे, अक्षय शेंडगे , अमीन शेख , सरफराज शेख , अमित पाटील ,प्रशांत खांडेकर ,अफजल मुजावर , नितीन माने, विक्रम शिंदे ,सचिन कांबळे , आदर्श कांबळे ,सचिन सगरे , राहुल यमगर , राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सेलचे व सांगली मिरज व कुपवाड शहरातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments