Homeराज्यसुलतानपुर येथील राज्यमहामार्गावर रस्तारोको..!

सुलतानपुर येथील राज्यमहामार्गावर रस्तारोको..!

सुलतानपुर मंडळातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांणा हेकटरी तात्काळ ५० हजारांची मदत व इतर मागण्या पूर्णत्वास नेण्यासाठी !

लोणार – सागर पनाड

सुलतानपूर येथे दि. १४ अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त शेतकरी व घरांची पडझड झालेल्या ग्रामस्थां णा शासना मार्फत तात्काळ मदत द्यावी या व इतर मागण्या मंजुर करुण घेण्यासाठी आज दि. १४ ला सकाळी वंचित बहुजन आघाडीचे संघपाल पनाड यांच्या नेतृत्वात येथील राज्यमहामार्गावर रस्तारोको आंदोलन करण्यात आले.

दि १० आक्टोबर ला सुलतानपुर मंडळात १०५ मिमि पाऊसाची नोंद होवुन झालेल्याने मंडळातील शेतकर्यां हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत दयावी तर अतिवृष्टी ने सुलतानपुर येथील ज्या ग्रामस्थां च्या घरांचे नुकसान झाले त्याणा सानुग्र मदत दयावी, जे घरकुल लाभार्थी प्रतिक्षा यादित आहेत त्याणा अनुदान देण्यात यावे तसेच लोणार पंढरपुर पालखी मार्ग व वेणी बोरखेडी रसत्या वरीले जंक्शन चे काम निकृष्ठ झाल्याने श्रीहरी कट्रेकशन व नळगे ठेकेदारांवर आणि सुलतानपुर ग्रामपंचायत च्या व महावितरण च्या काही कर्मचार्यांणी कामचुकार पना केल्या ने त्या कामाची चौकशी करुण दोषींवर कारवाई करण्यात यावी आदि मागण्या पूर्ण होण्यासाठी सदर चा रास्ता रोको अंदोलन करण्यात आले यावेळी राज्यमहामार्गाच्या दुतर्फा वाहनांन च्या तिन्ही बाजुस लांबच लाब रांगा लागल्या होत्या.

या वेळी अंदोलकांच्या वतीने शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला . यावेळी नागवंशी संघपाल पनाड, अनित्य घेवंदे, शे.अख्तर , मन्नान पटेल , जड्डा शेठ लोणार, भानदास पवार,शेख अमीर ,ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंदे, ग्रामपंचायत सदस्य झाकीर पठाण, मनोहर पनाड,विलास भाई लहाने, ,बबन पनाड,अशोक पनाड, गफ्फार शहा,

मुरलीधर नालींदे , राजहंस जावळे, अनिल पवार, शेख.राजीक , संजय पवार, राजेश पाटील सह असंख्य कार्यकर्ते नागरिक व नुकसानग्रस्त शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी हेड कॉन्स्टेबल प्रभाकर सानप, नाईक कॉन्स्टेबल राजेश जाधव,उमेश घुगे, पोलीस कॉन्स्टेबल उज्वल शिंदे यांनी बंदोबस्त ठेवुन होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments