Homeदेशअमृत महोत्सवी दौड 2022 कोल्हापूर या निमित्ताने कागल पी आय यांच्याकडून प्रोत्साहानार्थ...

अमृत महोत्सवी दौड 2022 कोल्हापूर या निमित्ताने कागल पी आय यांच्याकडून प्रोत्साहानार्थ बक्षिसे जाहीर…

कागल ;प्रतिनिधी…

येणाऱ्या 15 आँगस्ट अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त दि.14 आँगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक,मुंबई यांच्या वतीने कोल्हापूर येथे दहा किलोमीटर दौड स्पर्धा कोल्हापूर येथे आयोजित केली आहे.यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व कर्मचारी भाग घेणार आहेत.

त्यासाठी कागल पोलीस स्टेशन मधील जास्तीतजास्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी या दौड मध्ये भाग घ्यावा यासाठी कागल पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अजितकुमार जाधव यांच्या कडून प्रोत्साहानार्थ बक्षिसे व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.तर सदर बक्षिसे पुढील प्रमाणे 18 ते 40 वयोगटातील प्रथम बक्षीस 2000₹ आणि व्दितीय बक्षीस 1000₹,40 ते 50 वयोगटातील प्रथम बक्षीस 3000₹ आणि व्दितीय बक्षीस 2000₹ आणि 50 ते 58 वयोगटातील प्रथम बक्षीस 4000₹ आणि व्दितीय बक्षीस 3000₹ असे असणार आहेत.

याबाबत कागल पोलीस निरीक्षक अजितकुमार जाधव यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले या दौड मध्ये कागल पोलीस स्टेशन मधील जास्तीतजास्त पोलीस अधिकारी,कर्मचारी यांनी भाग घेऊन आपली शारीरिक क्षमता चांगली ठेवावी यासाठी प्रोत्साहानार्थ बक्षीस,प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments