HomeFeaturedराज्यदीप अमावस्ये निमित्त श्री शिवप्रातिष्ठान युवा हिंदुस्थान तर्फे दीपपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात...

दीप अमावस्ये निमित्त श्री शिवप्रातिष्ठान युवा हिंदुस्थान तर्फे दीपपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न…

सांगली – ज्योती मोरे

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान तर्फे दीप पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. यावेळी विधिवत दीपपुजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले. गटारी नव्हे दीप अमावस्या आपणच राखूया सन्मान आपल्या हिंदू सणांचा असा हॅशटॅग वापरुन या संदर्भात गेले ८ दिवस राज्यभरात जनजागृती केली होती. शहरात फलक लाऊन, विविध समाज माध्यमांतून, वृत्तपत्रातून जनजागृतीचे संदेश दिले गेले. या जनजागृतीस जनते मधून उत्तम असा प्रतिसाद मिळाला.

या प्रसंगी शिवतीर्थ सांगली येथे दीपपुजनाचा कार्यक्रम घेतला. म्हैसाळ हत्याकांडाचे अवघ्या काही दिवसातच कसोटीने तपास करून लावलेला छडा तसेच, तासगाव येथे नवजात अर्भकाचे अपहरण झाल्यानंतर अवघ्या ८ तासात आरोपिंना अटक करून त्या अर्भकास तीच्या मातेकडे सुपूर्द केले.या कारवाई मध्ये संपूर्ण सांगली पोलिस दलाचे कौतूक आहे,

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली चे कर्मचारी सागर गिरीजापति टिंगरे, संदीप गुरव, अनिल कोळेकर, तासगाव पोलिस स्टेशन चे कर्मचारी सागर लवटे, सोमनाथ गुंडे, विटा पोलिस स्टेशन चे अमोल जाधव, प्रसाद सुतार, सुहास स्वामी यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.

म्हणून यावेळी त्यांच्या हस्ते विधिवत दीप पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी श्री शिवप्रातिष्ठान युवा हिंदुस्थान तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी श्री शिवप्रातिष्ठान युवा हिंदुस्थान चे ज्येष्ठ मार्गदर्शक, प्रसिद्ध उद्योजक मनोहर(भाई) सारडा, आनंदराव (तात्या) चव्हाण, रामभाऊ जाधव, रवि सावंत, अरुण शिंदे, अमित भोसले यांच्या हस्ते श्रीफळ ,शाल व पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रमाणेच हिंदू धर्मातील दिवाळी, गाणेशोस्तव, महाशिवरात्री, वटपौर्णिमा अशा सणांचा अपमान सहन करून घेतला जाणार नाही. त्याला चोख उत्तर देण्यात येईल. सर्व हिंदू बांधवांनी आशाच प्रकारे जागृत राहावे, असे अवाहन श्री शिवप्रातिष्ठान युवा हिंदुस्थान चे संस्थापक, अध्यक्ष नितीन चौगुले यांनी केले.

यावेळी श्री शिवप्रातिष्ठान युवा हिंदुस्थान चे प्रमुख सहकारी प्रकाश निकम, अजिंक्य बोळाज, सतीश खांबे, भूषण गुरव, कौशिक बेलवलकर, सचिन मोहिते, दिगंबर साळुंखे, सचिन ओमासे, संग्राम मोहिते, जयदीप चेंडके, युवराज जाधव, मोहन धुमळ, प्रतीक पाटील, प्रदीप पाटील, माणिक गस्ते, राजू जाधव, अमित भोसले, संतोष माने, यशवंत शिंदे, आकाश पाटील, अक्षय रेपे, रोहित मोरे व सर्व युवा सहकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments