Homeराज्यपोलीस अंमलदार विजयकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार आश्रमात केले भोजनदान...

पोलीस अंमलदार विजयकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार आश्रमात केले भोजनदान…

कोगनोळी – राहुल मेस्त्री

कागल पोलीस ठाण्यातील बहुतांश पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी यांच्यामध्ये कुणाचाही वाढदिवस साजरा करताना नेहमीच सामाजिक बांधिलकी म्हणून निराधार आश्रमात समाजातील उपेक्षित लोकांना मदत करून वाढदिवस साजरा करत असतात.

त्याचप्रमाणेच माजी सैनिक आणि सध्या कागल पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत असणारे विजयकुमार शिंदे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्चाला मुठमाती देऊन मत्तिवडे ता.निपाणी येथील भारतीय समाज सेवा निराधार आश्रमात भोजनदान केले.इतकेच नाही तर स्वतः आपल्या हाताने पंक्तीत बसलेल्या लोकांना जेवण वाढले .त्याचबरोबर काही जिवनावश्यक वस्तूंचे देखील वितरण केले.

यावेळी भारतीय समाज सेवा निराधार आश्रमाच्या वतीने त्यांचा उपेक्षित लोकांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला.या केलेल्या मदतीबद्दल आश्रम चालक अमर पोवार आणि शुभांगी पोवार यांनी कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले.याप्रसंगी पोलीस नाईक विनायक औताडे,सचिन कांबळे,धिरज कांबळे,फैजल पठाण आदी उपस्थित होते..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments