Homeराज्यराष्ट्रवादी काँग्रेसच्या २३व्या वर्धापनदिना निमित्त कार्यकर्ता मेळावा संपन्न...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २३व्या वर्धापनदिना निमित्त कार्यकर्ता मेळावा संपन्न…

सांगली – ज्योती मोरे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालया मध्ये सकाळी १० वाजून १० मिनिटांनी झेंडावंदन करण्यात आले.व त्यानंतर कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी बोलताना शहर-जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज म्हणाले की,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत.देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना, अनेकांना पक्षाच्या माध्यातून ग्रामपंचायती पासून ते लोकसभा, विधानसभा,महापालिके पर्यंत नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रभागात जनतेची विधायक अशी कामे करून स्वतःची ओळख तयार करायला हवी.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली महापालिकाक्षेत्रामध्ये काम करत असताना पक्षाची ध्येय धोरणे ही जनतेपर्यंत पोहचवण्याच काम आपण एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून करायला हवे.

युवक राष्ट्रवादी काँग्रेस शहर-जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार म्हणाले की,पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ५५ वर्षाच्या राजकारणात महाराष्ट्र राज्याला एक प्रगत व समृद्ध तेची दिशा मिळाली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ वर्षाच्या कार्यकाळात राज्यात पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राज्यात नेतृत्वाची फळी उभी करून राज्यात अनेक विकासात्मक, धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत.येणाऱ्या काळात महापालिकाक्षेत्रामध्ये प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचाराचा कार्यकर्ता घडवण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

महापौर दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले की,महापालिकाक्षेत्रामध्ये ना.जयंतराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून हजारो कोटींची विकासकामे झालेली आहेत व काही कामे ही पूर्णत्वाकडे जात आहेत.या होत असलेली विकास कामे आपण जनतेपर्यंत पोहचवण्याच काम राष्ट्रवादीचा प्रत्येक पदाधिकाऱ्यांसह सर्वांनी करायला हव.

यावेळी कार्यकर्ता मेळाव्यात, शहर-जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील ,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील युवक राष्ट्रवादी शहर-जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार,महापौर दिग्विजय सूर्यवंशी,महिला ग्रामीण जिल्हाध्यक्षा सुश्मिता जाधव , नगरसेवक विष्णु माने, शेडजी मोहिते , योगेंद्र थोरात,हरिदास पाटील,मनगु आबा सरगर,स्वाती पारधी,मुस्ताक रंगरेज,शिवाजी दुर्वे,

सांगली शहर अध्यक्ष सागर घोडके,मिरज शहर अध्यक्ष अभिजीत हारगे,कुपवाड शहर अध्यक्ष संजय तोडकर,धनंजय पाटील समीर कुपवाडे,अल्पसंख्याक शहर-जिल्हाध्यक्ष आयुब बारगीर,महीला अध्यक्षा अनिता पांगम,वंदना चंदनशिवे,वैशाली कळके,उत्तमआबा कांबळे,विनायक हेगडे,गॅब्रियल तिवडे,संजय औंधकर,ज्योती आदाटे,असीफ बावा ,अरिफ चौधरी,संध्या आवळे,अर्जुन कांबळे,यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व फ्रंटल सेलचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments