HomeFeaturedसामाजिककोगनोळी येथील दोन स्थानिक राजकीय नेते एकाच दिवशी काळाच्या पडद्याआड…

कोगनोळी येथील दोन स्थानिक राजकीय नेते एकाच दिवशी काळाच्या पडद्याआड…

कोगनोळी ; प्रतिनिधी….

कोगनोळी ता.निपाणी येथे दि.8 रोजी दोन स्थानिक राजकीय नेते एकाच दिवशी काळाच्या पडद्याआड गेल्याची घटना घडली आहे..येथील व्यवसाय सेवा संघाचे माजी चेअरमन व कोगनोळी मंडल पंचायतीचे माजी प्रधान शरद रायगोंडा पाटील वय वर्षे 75 यांचे बुधवार दि.8 रोजी निधन झाले.ते कोगनोळी येथे अजातशत्रू व्यक्ती महत्त्व ओळखले जायचे.येथील वकील अमर पाटील यांचे ते वडील होत.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे…

तर दुसरीकडे याच दिवशी कोगनोळी येथील हनबरवाडी म्हणून परिचित असलेल्या ठिकाणचे रहिवासी ,कोगनोळी व पंचक्रोशीतील मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे माजी ग्रामपंचायत सदस्य,आणि जय हनुमान पीकेपीएसचे संस्थापक चेअरमन मारुती कोळेकर यांचे देखील अल्पशा आजाराने दि.8 रोजी निधन झाले.ते 58 वर्षाचे होते.स्थानिक राजकारणातील आक्रमक चेहरा म्हणून ही त्यांना पाहिले जायचे.त्यांच्या.पश्चात पत्नी,भाऊ,मुलगा,मुली,नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन दि.10 रोजी सकाळी 9:00 वा.त्यांच्या राहत्या घरी आहे…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments