Saturday, April 20, 2024
Homeकृषीकृषी पंपासाठी युध्दस्तरावर दिले रोहीत्रे बदलवून, पाच पेक्षा जास्त वर्षापासून भरले नाही...

कृषी पंपासाठी युध्दस्तरावर दिले रोहीत्रे बदलवून, पाच पेक्षा जास्त वर्षापासून भरले नाही दिड लाख कृषी पंपधारकांनी एकदाही वीज बिल…

Share

परिमंडळाची थकबाकी १ हजार ७७२ कोटी

अमरावती,दि.१६ जानेवारी २०२३; शेतीचा रब्बी हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी पाण्याची सोय व्हावी, व शेतकरी थकीत वीजबिल भरतील या अपेक्षेने महावितरणकडून परिमंडळात कृषीपंपाना युध्दस्तरावर माहे नोव्हेंबर, डिसेंबर व चालू महिन्यात आतापर्यंत १५०७ नादुरूस्त रोहित्रे बदलविण्यात आली आहेत. तथापि शेतकऱ्यांकडून कृषी पंपाचे वीजबिल भरण्याला सकारात्मक प्रतिसादत मिळाला नसल्याने कृषीपंपाच्या एकून थकबाकीत वाढ झाली आहे.

टिव्ही,गॅस,मोबाईल रिचार्ज पेक्षाही किंबहुना महावितरणच्या वीजबिलाला प्राधान्य देेण्याची गरज असतांना, परिमंडळाअंतर्गत अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील १ लाख ४६ हजारापेक्षा जास्त कृषिपंपधारकांनी पाच वर्षापेक्षा जास्त कालावधीत एकदाही वीज बिल भरले नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे १ हजार ७७२ कोटी थकले आहे. अशावेळी महावितरण विजेचे नियोजन कसे करणार यावर थकबाकीदार शेतकऱ्यांनी विचार करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरण वीज निर्मिती करत नाही, तर विविध स्रोतांकडून दरमहा वीज विकत घेऊन ती वीज आपल्या ग्राहकांना वितरीत करीत असते. असे असतांना महावितरणच्या सर्वच वर्गवारीतील ग्राहकांनी वेळेत वीजबिल भरणे गरजेचे आहे.परंतू शेतीसाठी सवलतीचा वीजदर असतांनाही शेतकरी बांधव वीज बिल भरण्याला प्रतिसाद देत नसल्याची परिस्थिती आहे.सध्यास्थितीत महावितरणची राज्यात ५० हजार कोटीपेक्षा जास्त थकबाकी आहे.

त्यामुळे थकबाकीत आणखी वाढ होणे हे महावितरणच्या अस्तित्वासाठी धोक्याची बाब असल्याचे स्पष्ट होते. एकट्या अमरावती परिमंडळातील १ लाख ४६ हजार ८१५ ग्राहकांनी पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊनही एकदाही शेतीचे विजेचे बिल भरले नाहीत.त्यामुळे त्यांच्याकडे एकून १ हजार ७७२ कोटी ६२ लाख रूपये थकले आहे.जिल्ह्यानुसार थकबाकीत अमरावती जिल्ह्यातील पाच वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून एकदाही बिल भरण्याला प्रतिसाद न देणाऱ्या ७७ हजार ७० कृषीपंप धारकाकडे एकुण ८३२ कोटी ४२ लाख रूपये थकीत आहे,तर यवतमाळ जिल्ह्यातील ६९ हजार ७४५ ग्राहकांकडे ९४० कोटी २० लाख रूपये थकले आहे.

महावितरण ग्राहक सेवेसाठी बांधिल आहे. महावितरणच्या एकून महसुलापैकी ८५ टक्के खर्च हा वीज खरेदीवर होत असतो आणि उर्वरित १५ टक्क्यात घेतलेल्या कर्जावरील व्याज,देखभाल दुरूस्ती आणि इतर प्रशासकीय खर्च करण्यात येतो.कृषी क्षेत्राची दिवसेंदिवस वाढत असलेली थकबाकी हा महावितरणचा चिंतेचा विषय बनलेला असून महावितरणच्या मुख्यालयाने याची नुकतीच गांभिर्याने दखल घेतली आहे. त्यामुळे थकबाकीचा ग्राहकसेवेवर परिणाम होऊ नये याचा शेतकरी ग्राहकांनी देखील विचार करून थकीत वीजबिल भरून सहकार्य करावे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: