HomeराजकीयMLC Election | काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवार जाहीर...

MLC Election | काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवार जाहीर…

मुंबई दि.८ : भाजपकडून सकाळी उमेदवारांची यादी जाहीर होताच आता कॉंग्रेस ने आपल्या दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. राज्यातील १० विधान परिषदेच्या जागांसाठी २० जून रोजी निवडणुक होत असून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. काँग्रेसकडून यंदा विधान परिषदेसाठी भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

या निवडणुकीसाठी मोहन जोशी, सिद्धार्थ हत्ती अंबरे, हर्षवर्धन सपकाळ, सचिन सावंत, अतुल लोंढे यांच्या नावांचीही चर्चा होती. मात्र आता दिल्लीतून जगताप आणि हंडोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. सोनिया गांधी यांनी या दोन नावांवर सहमती दर्शवल्याची माहिती काँग्रेस सरचिटणीस मुकील वासनिक यांनी दिली आहे.

भाजपची यादी

भाजपकडून यंदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे राज्य सरचिटणीस श्रीकांत भारतीय, माजी मंत्री राम शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपने या निवडणुकीतही पंकजा मुंडे यांना संधी दिलेली नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments