Saturday, April 20, 2024
Homeगुन्हेगारीशेअर मार्केटिंग व हनी ट्रॅपच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक फसवणूकी संदर्भात जनजागृतीसाठी मेळाव्याचे...

शेअर मार्केटिंग व हनी ट्रॅपच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक फसवणूकी संदर्भात जनजागृतीसाठी मेळाव्याचे श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान कडून आयोजन

Share

सांगली प्रतिनिधी –ज्योती मोरे

आपल्या जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून शेअर मार्केटिंग इन्वेस्टमेंट च्या नावाने अनेक बोगस कंपन्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. सर्वसामान्य गरीब, शेतकरी, डॉक्टर, वकील, शिक्षक, व्यापारी आशा समाजातील अनेक घटकांकडून फसवणूक करून आर्थिक लूट मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. तसेच सोशल मिडिया च्या माध्यमातून अनेक तरुणांची व नागरिकांची हनी ट्रॅप द्वारे आर्थिक लूट झालेली दिसून येत आहे.

मात्र या संदर्भात फसवणूक झालेले लोक कायद्याच्या आज्ञानापोटि तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. या संदर्भात सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांना व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना भेटून निवेदन दिलेले आहे.

या संदर्भात जनजागृतीसाठी “श्री शिवप्रातिष्ठान युवा हिंदुस्थान” या संघटनेच्या माध्यमातून दिनांक ०८/०८/२०२२ रोजी दुपारी ४.३० वाजता डेक्कन मॅन्यूफ्रॅक्चर्स असोसिएशन हॉल, मधवनगर रोड, सांगली येथे हा जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

“सांगली जिल्हा पोलिस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम साहेब”यांच्या मार्गदर्शनाखाली “आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक” आणि “सायबर सेल” चे प्रतिनिधी, प्रसिद्ध उद्योजक सतिश शेठ मालू या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व गुंतवणूकदार, एजंट्स,नागरिक बंधु भगिनींनी सदर मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: