Homeराज्यगडमुडशिंगीत पहिल्या अभिनव खरीप बियाणे बाजाराचे आयोजन...

गडमुडशिंगीत पहिल्या अभिनव खरीप बियाणे बाजाराचे आयोजन…

कोल्हापूर प्रतिनिधी-राजेद्र ढाले

खाजगी बियाणे उत्पादक कंपन्यांची कमी होत चाललेली विश्वासार्हता बियाणांची कमी उपलब्धता अवास्तव किंमत अशा अनेक कारणामुळे ब्रँडेड बियाणांपेक्षाही स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांकडून उत्पादित बियाणे वापरून भरघोस उत्पादन घेणे शक्‍य असून शेतकऱ्यांच्या बियाणांची उगवण क्षमता चाचणी कृषी विभागामार्फत करण्यात येत असली तरीही या बियाणांच्या उगवण क्षमतेची चाचणी शेतकऱ्यांनी स्वतः घरी करावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी गडमुडशिंगी येथे आयोजित खरिप बियाणे बाजार च्या उद्घाटन प्रसंगी केले.

खरिपाच्या पेरणीसाठी बियाणांची प्रचंड मागणी असून मोठ्या कंपन्यांकडून फक्त वीस टक्केच पुरवठा शक्य असल्याने व ८० टक्के बियाण्यांचा पुरवठा हा स्थानिक शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांना माफक दरात होत असल्यामुळे या पारंपारिक बियाणे खरेदी प्रक्रियेमध्ये शासन सहभागी होऊन उगवण क्षमता चाचणी व बीजप्रक्रिया याबाबतचे शास्त्रीय मार्गदर्शन शेतकऱ्यांना देण्याचा अभिनव उपक्रम जिल्हा कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. गडमुडशिंगीच्या सरपंच सौ. अश्विनी शिरगावे यांनी गावातील शेतकऱ्यांना स्थानिक शेतकऱ्यांच्याकडून उत्पादित बियाण्यांचा वापर करण्याचे आव्हान केले. तसेच गडमुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील कृषी विभागाच्या या मोहिमेचे कौतुक करीत खरीप बियाणे बाजारचे महत्त्व विशद केले.

तसेच कृषी विभागाच्या अनेक योजनांमध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी आणखीन चांगल्या योजना राबवण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी गडमुडशिंगी, वसगडे येथील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या बियाणांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलला स्थानिक शेतकऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून तब्बल ३० क्विंटल बियाणे यावेळी हातोहात विकले गेले. तसेच स्टॉलवर उपलब्ध नसणाऱ्या बियाणांचे बुकिंगही मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. राजश्री राजश्री छत्रपती शाहू कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी बीजप्रक्रियेसाठी आवश्यक जैविक खते, हुमणी किड नियंत्रणासाठी जैविक औषधे, गांडूळखत यांचा स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलवर या विद्यार्थ्यांनी उत्पादित केलेल्या आवळा कॅन्डी व हळद या उत्पादनांचा ही समावेश होता.

यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी या बाजारास भेट देऊन तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन बियाण्यांची खरेदी केली. कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, मंडल कृषी अधिकारी सौ रोहिणी वाळवेकर, ग्रामपंचायत सदस्य अमित माळी, सुरज कांबळे, सर्जेराव धनवडे, सुधाकर पाटील, रणजीत राशिवडे, दिलीप दळवी, अरुण शिरगावे, अशोक निंगुडे ,सुनील पाटील व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन कृषी सहायक स्मिता नवलगी यांनी केले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments