Thursday, April 25, 2024
Homeराज्यअकोला जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण घोषित, ७ पैकी ५ सभापती...

अकोला जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण घोषित, ७ पैकी ५ सभापती पदे महिलांकरिता, अकोला पंचायत समिती अविरोध…

Share

आकोट – संजय आठवले

बहुप्रतिक्षित असलेले अकोला जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण अखेर १३ ऑक्टोबर रोजी घोषित झाले असून जिल्ह्यातील ७ पैकी ५ सभापती पदे विविध संवर्गातील महिलांच्या वाट्याला आली आहेत. त्यातील अकोला पंचायत समिती सदस्यांमध्ये एकच महिला सदस्य, घोषित झालेल्या आरक्षित संवर्गातील असल्याने अकोला पंचायत समिती सभापती पदाची ही महिला भाग्यवान विजेता ठरली आहे.

शासकीय अडचणींमुळे अकोला जिल्ह्यातील रखडलेले पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे दिनांक १३ ऑक्टोबर रोजी काढण्यात आले. त्यामध्ये तेल्हारा- अनुसूचित जाती महिला, मूर्तिजापूर- अनुसूचित जाती सर्वसाधारण, अकोला- अनुसूचित जमाती महिला, आकोट- सर्वसाधारण महिला, पातूर- नामाप्र महिला, बाळापूर- सर्वसाधारण, बार्शीटाकळी- सर्वसाधारण महिला असे घोषित करण्यात आले.

यात विशेष बाब म्हणजे जिल्ह्यातील ७ पैकी ५ पंचायत समिती पदे महिलांकरिता आरक्षित झाली आहेत. महिलांसाठी असलेल्या ५०% आरक्षण तरतुदीनुसार ७ पैकी ४ जागी महिला आरक्षण असावयास हवे होते. मात्र या ठिकाणी ७ पैकी ५ जागा महिलांना देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे या संदर्भात कोणीही न्यायालयाचे दार ठोठावू शकतो. असे न झाल्यास अकोला जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदी महिलांचा दबदबा राहणार हे निश्चित. त्यातच उर्वरित २ जागीही तेथील सदस्यांनी महिला उमेदवारच विजयी केल्यास संपूर्ण अकोला जिल्हा महिला प्रधान ठरू शकतो.

अकोल्यात सुलभा सोळंके ठरल्यात भाग्यवान विजेता – अकोला पंचायत समितीची एकूण सदस्य संख्या २० आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीचे ११ सदस्य म्हणजे बहुमत आहे. त्यामुळे या ठिकाणी वंचितचा ध्वज फडकणे अपेक्षित होते. मात्र सभापती पदाच्या आरक्षित संवर्गातील महिला वंचित कडे नसल्याने बहुमत असूनही या ठिकाणी वंचितला सभापती पदापासून वंचित राहण्याची पाळी आली आहे. परंतु २० सदस्यांमध्ये मात्र ३ सदस्य असलेल्या भाजपला येथे आयतीच संधी चालून आली आहे.

भाजपच्या ३ सदस्यांमध्ये घोषित आरक्षण संवर्गातील उगवा गणातील सुलभा सोळंके ह्या एकमेव पात्र उमेदवार असल्याने अकोला पंचायत समिती सभापती पदी त्यांची आपोआपच वर्णी लागणार आहे. त्यामुळे सभापती पदाच्या दिवाळी बंपर ड्रॉच्या त्या भाग्यवान विजेता ठरल्या आहेत. परिणामी येथे ध्वजदंड वंचितचा तर ध्वज भाजपचा असे चित्र दिसणार आहे.

आकोट येथे रस्सीखेच – सोळा पंचायत समिती सदस्य असलेल्या आकोट पंचायत समितीमध्ये वंचित ७, शिवसेना ४, भाजप ३, काँग्रेस १, प्रहार १ असे पक्षीय बलाबल आहे. ह्या पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिलेकरिता आरक्षित झाले आहे. वंचितला येथे बहुमता करता २ सदस्यांची आवश्यकता आहे. वंचित विरोधात येथे शिवसेना, भाजप, काँग्रेस व प्रहार मिळून ९ सदस्यांची महायुती होऊ शकते. मात्र राज्याच्या राजकारणातील घामासान पाहता असे होण्याबाबत मोठी साशंकता आहे.

पण तसे झालेच तर ९ सदस्यांच्या संख्याबळावर येथे वंचित विरोधी सभापतीची पदस्थापना होऊ शकते. परंतु वंचित ने कोणत्याही २ सदस्यांना सोबत घेतल्यास अथवा नेहमीप्रमाणे भाजप तटस्थ राहिल्यास इथे वंचित बाजी मारू शकते. विरोधी गटात सैंधमारी करून सदस्य आपल्याकडे वळता करणारा उमेदवार दिल्यासही वंचितचा लाभ होऊ शकतो. त्यामुळे हा लाभ आणि आगामी निवडणुकीचे समीकरण लक्षात घेता, वंचित कडून सौ. इम्तियाज बी मुश्ताक ह्या राजकीय वारसा असलेल्या महिलेस उमेदवारी दिली जाऊ शकते.

तेल्हारा येथे वंचित चा दबदबा – तेल्हारा पंचायत समितीची एकूण सदस्य संख्या १६ आहे. त्यात वंचित ११, शिवसेना २ व भाजप ३ असे पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे या ठिकाणी वंचित आघाडीची एक हाती सत्ता आहे. परिणामी येथे वंचितचा सभापती होणार हे उघड आहे.

ही पंचायत समिती नवीन आरक्षणा नुसार अनुसूचित जाती महिलेकरता आरक्षित करण्यात आली आहे. ११ सदस्यिय वंचितकडे या संवर्गातील २ महिला सदस्य आहेत. त्यातील एक महिला सदस्य ह्या अन्य पक्षातून आलेल्या आहेत. त्यामुळे वंचित ची मूळ कार्यकर्ता असलेल्या पंचगव्हाण गणातील सौ. आम्रपाली सुमेध गवारगुरु यांची सभापती पदाकरिता तगडी उमेदवारी मानली जात आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: