Saturday, April 20, 2024
Homeगुन्हेगारीवीज चोरीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाचेही सहकार्य मिळणार...

वीज चोरीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाचेही सहकार्य मिळणार…

Share


• पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी आणि महावितरण अधिक्षक अभियंता दिलीप खानंदे यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा
• शहरात आठ महिन्यात ७६३ वीज चोऱ्या उघड, वीज चोरीचे ५३ गुन्हे दाखल

अमरावती – वीज चोरी हा दखलपात्र गुन्हा असुन ,कायद्यात  वीज चोरीसाठी ३ वर्षापर्यंत कारावस व दंड असे शिक्षेचे प्रावधान करण्यात आले आहे.त्यामुळे प्रस्तुत कायद्यातील तरतुदीनुसार वीज चोरीसंदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्यात कारवाईला गती देण्यासंदर्भात अमरावती शहर पोलीस आयुक्त श्री नविनचंद्र रेड्डी ,पोलीस उपायुक्त  सागर पाटील ,महावितरणचे अधिक्षक अभियंता दिलीप खानंदे,कार्यकारी अभियंता आनंद काटकर,विधी अधिकारी प्रशांत लहाने यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली.

महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांनी (दि.२० जाने.)अमरावती पोलीस आयुक्त श्री.नविनचंद्र रेड्डी यांची भेट घेतली आणि वीज चोरीच्या दाखल गुन्ह्यातील पुढील कारवाईला गती द्यावी, तसेच वीज चोरीला आळा घालण्याच्या महावितरणच्या प्रयत्नाला सहकार्य करण्यासंदर्भात विनंती केली.

यावर पोलीस आयुक्तांनी मागील वर्षभरात दाखल झालेल्या एकून गुन्ह्याची माहिती मागुन घेतली.तसेच वीज चोरी हा अपराध असल्याने वीज चोरीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून महावितरणला आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

अमरावती शहरातील चित्रा,ताज आणि इमामनगर वीज वाहिनीवर ७० टक्क्यापेक्षा जास्त वीज चोरी आहे.याचबरोबर शहरातील वीज चोरी असलेल्या इतर भागातही महावितरणकडून दररोज वीज चोरीच्या कारवाया केल्या जातात. तडजोड रकमेसह वीज चोरीचे शुल्क न भरणाऱ्या ग्राहकांवर विद्युत कायदा २००३ कलम १३५ व १३८ अंतर्गत वीज चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येतो. 

महावितरणकडून अमरावती शहरात एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ दरम्यान अनाधिकृत वापराच्या ४ ,आकोडे टाकून वीज चोरीच्या २४ आणि  मीटरमध्ये फेरफार करणाऱ्या ७३५ अशा एकून ७६३ वीज चोरीच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. तडजोड शुल्कासह वीज चोरीची रक्कम न भरण्याला प्रतिसाद न देणाऱ्या ५३ ग्राहकांवर विद्युत कायदाअंतर्गत कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच यापुढे वीज चोरी विरोधात मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: