Friday, March 29, 2024
Homeराज्यचक्क….! मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार...प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम...

चक्क….! मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…

Share

अपण नेहमी ऐकतो की शिक्षणामध्ये असो वा प्रशासनामध्ये मुस्लिमांचे प्रतिनिधित्व अत्यंत नगण्य अश्या प्रकारचे आहे आणि त्यामुळे समाजाची प्रगती होत नाही ही समस्या तर अवघ्या भारतात सर्वांना माहिती आहे.परन्तु या समस्येतुन समाजाला काढण्यासाठी पुसद येथील तरुण आणि तडफदार व समाजाची जाण असणारे व स्वतः उच्च शिक्षित असणारे प्रा.सय्यद सलमान सरांनी या समस्येला दूर करण्यासाठी चक्क मशीद गाडली कारण मुस्कीम समाजात मशिदीला खुप महत्व आहे.

पवित्र स्थळ असल्यामुळे इथे समाजातील तरुणांना चांगल्याप्रकारे मागर्दशन करता येते व मशिदीत सर्व येतात त्यामुळे थेट मशिदीत पोलिस भर्तीच्या कार्यशाळेचे कार्यक्रम करत आहे .आता जी पोलीस भर्ती निघाली ज्यात १८००० पेक्षा जास्त जागा आहे परन्तु अल्पसंख्याक समाजातील मुलांना यावबद्दल माहिती पाहिजे त्या प्रमाणात नसल्यामुळे तसेच एम,पि,इस,सी व यु,पि, एस, सी सारख्या स्पर्धा परीक्षेची माहिती नसल्यामुळे या क्षेत्रात मुले येत नाही त्यामुळे प्रा.सलमान सर हे स्व खर्चाने अवघ्या महाराष्ट्रभर दौरे करून मुस्लिम तरुणांना पोलीस भर्ती बद्दल मोफत कार्यशाळा घेत आहे व शैक्षणिक जनजागृतीचे कार्य करत आहे.

त्याचे सर्व अल्पसंख्याक धार्मिक संस्थांना आव्हान आहे की त्यांनी अश्या प्रकाचे कार्यक्रमाचे जर आयोजन केले तर प्रा.सलमान सर तेथे मोफत येऊन मार्गदर्शन करेल कारण आज मुलांना शैक्षणिक मागर्दशनाची फार आवश्यकता आहे विशेषतः स्पर्धा परीक्षेच्या मागर्दशनाची त्यामुळे सरांना यासाठी सोपा मार्ग म्हणून मशिदीत मागर्दशन करण्याचे उपक्रम सुरू केले त्याचा फायदा असा झाला की यासाठी कोणत्याच प्रकारचं खर्च लागत नाही तरुणांना येण्यासाठी सुद्धा सोपं असते कारण सर्व नमाज पठण करण्यासाठी येतच असतात म्हणून नमाज नन्तर हा कार्यक्रम तिथंच घेण्यात येतो म्हणून या कार्यक्रमाला खूप प्रतिसाद मिळत आहे.व प्रा.सलमान सरांनी या कार्यासाठी स्वतःला झोकून दिले आहे.

प्रा.सलमान सरांनी आता पर्यंत 15 वेग-वेगळ्या ठिकाणी ठिकाणी असे सेमिनार/शिबिर/कार्यशाळा केल्या असून त्यामुळे आतापर्यंत ४००० मुस्लीम तरुणांना फायदा झाला आहे तसेच सर सेमिनार झाल्या नन्तर ऑनलाइन सुध्दा मोफत मागर्दशन करतात ऑनलाइन मध्ये सुद्धा ३०००मुलं जोडल्यागेली आहे तसेच सलमान सर महिला २०१५ पासून अल्पसंख्याक मुलांना स्पर्धा परीक्षेच मागर्दशन करत आहे.

अल्पसंख्याक मुलांना जे सर्वात मोठी समस्या आहे मराठी भाषेची ती सर स्वतः शिकवीतात ते पण अत्यंत सोप्या भाषेत आणि सम्पूर्ण महाराष्ट्रातील मुलांना मराठी भाषा अगदी सोप्या पद्धतीने यावी म्हणून सरांनी मराठी भाषा अकॅडमी नावाचं युट्युब चॅनल उघड आहे.

यांद्वारे सर ऑनलाइन मोफत मागर्दशन करतात कारण प्रा.सलमान सर स्वतः चक्क मराठी भाषेत पि,एच,डी करत आहे ते पण संत साहित्यात त्यामुळे सरांना मराठी भाषेची खूप आवड आहे व ते मराठी भाषेच्या जनजागृतीसाठी वेग-वेगळे उपक्रम सुद्धा घेत असतात अश्या प्रकारे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या तालुक्यातील प्रा.सय्यद सलमान सै शेरू सरांनी अल्पसंख्याक तरुणांसाठी अश्या प्रकाचे महत्वपूर्ण व समाजाने आदर्श उपक्रम घेऊन महत्वपूर्ण शैक्षणिक जागृटीचे कार्य करत आहे.आज अल्पसंख्याक समाजाला अश्या प्रकारच्या मार्गदर्शकांची फार आवश्यकता आहे जे ग्राउंड लेव्हल वर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्य करत आहे


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: