Friday, March 29, 2024
Homeराजकीयराजकीय दहीहंडी…BMC निवडणुकीसाठी भाजपने दाखवली ताकद…

राजकीय दहीहंडी…BMC निवडणुकीसाठी भाजपने दाखवली ताकद…

Share

काल मुंबईत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त वेगळेच राजकीय दृश्य पाहायला मिळाले. शिवसेनेचा गड असलेल्या अनेक ठिकाणी भाजपने दहीहंडी मोठ्या थाटात साजरी केली, या दहीहंडीला राज्याचे चाणक्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक दहीहंडीच्या कार्यक्रमास हजेरी लावली. मुंबईतील बहुतेक दहीहंडी कार्यक्रम हे राजकीय पक्षाचे होते, त्यातील सर्वाधिक हे BJP ने आयोजित केले.

होऊ घातलेल्या BMC निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी BJP ची जोरदार तयारी कालच्या दहीहंडी कार्यक्रमात दिसली याच मंचावरून राजकीय टोलेबाजी बघायला मिळाली सोबतच आम्हीच ताकदवर आहोत याच दर्शन सुद्धा मुंबईकरांना बघायला मिळाले. भाजपची तयारी बघून शिंदे गटानेही ठाण्यात चांगलीच धूम केली, सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने पक्षाच्या कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी दहीहंडीसाठी क्रीडा विमा आणि आरोग्य विमाही जाहीर केल्याने गोविंदा पथकाची मने जिंकली असली तरी सामान्य मुंबईकर हुशार असल्याने वेळ पाहून तो निर्णय घेतो.

येणाऱ्या BMC निवडणुकीसाठी भाजपने मुंबई शहरात 370 दहीहंडी उत्सव आयोजित केल्याची आकडेवारी सांगते. हे आधीच्या 150-170 च्या सरासरी आकड्यापेक्षा खूप जास्त आहे. उत्सवाशी संबंधित प्रत्येक पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि फडणवीस यांच्या फोटोंचा समावेश होता. यातील सर्वात खास म्हणजे वरळी येथील जांबोरी मैदानाचा कार्यक्रम, जिथे भाजपचे नवी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

आदित्य ठाकरे यांचा हा गड आहे. भाजप शेलार यांना आदित्यसमोर प्रोजेक्ट करत आहे. फडणवीस यांनीही कार्यक्रमाला पोहोचून दहीहंडी फोडली. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यात शिंदे कॅम्पच्या सदस्यांनी मोठ्या प्रमाणावर दहीहंडीचे आयोजन केले होते. मुंबई आणि ठाण्यातील शिवसेनेचे बहुतांश आमदार आता मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत आहेत. मात्र काल आदित्य ठाकरे यांनी खासदार राजन विचारे यांच्या जांभळी नाका येथील दहीहंडीला हजेरी लावली. या उत्सवाच्या व्यासपीठावर येण्यापूर्वी त्यांनी टेंभीनाका येथील आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले असून त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत.

पावसाळ्यानंतर बीएमसीच्या 227 प्रभागांमध्ये निवडणुका होऊ शकतात. विशेष म्हणजे तीन दशकांहून अधिक काळ शिवसेनेच्या एकहाती सत्ता आहे, मात्र पक्षातील बंडखोरी आणि राज्यातील सत्तेत भाजप प्रवेशानंतर समीकरणे बदलू शकतात. 2017 मध्येही भाजप आणि शिवसेना एकत्र होते, परंतु दोन्ही पक्षांनी बीएमसी निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती. एकीकडे शिवसेनेला 84 जागा मिळाल्या. त्याचवेळी भाजपने 82 जागा जिंकल्या.

संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडी साजरी केली जाते, पण मुंबईत मात्र त्याबद्दल वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. शिवसेनेनेही याठिकाणी सक्रियता वाढवत दहीहंडी उत्सवातील अनेक कार्यक्रमात आपली उपस्थिती नोंदवली. इकडे राष्ट्रवादी काँग्रेसही नंतर सावध होऊन नवी मुंबईत दहीहंडीच्या कार्यक्रमात गुंतली होती. 31 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या 10 दिवसांच्या गणेशोत्सवाकडे भाजपचे लक्ष असणार आहे….


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: