अकोला – मेघ गर्जना आणि वीजेच्या कडकडासह सुसाट वाऱ्याच्या सोबतीने काल शनिवारी रात्रीला आलेल्या पाऊसात अकोला औद्योगिक वसाहतीत वीज कोसळून जवळपास १० गोवंश मृत्युमुखी पडले.अकोला औद्योगिक वसाहतीत पेज क्रमांक ३ मधिल अमरीश डाळ मिल परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे.
सुसाट वाऱ्यासोबत पाऊस कोसळत असताना, आकाशातून कडकडाट एक वीज जमीनीकडे झेपावत औद्योगिक परिसरात कोसळली.अनेकांच्या जीवाचा थरकाप उडाला.पाऊसाचा जोर कमी झाला.तेव्हा आकाशातील वीज अमरीश डाळ मिल परिसरातील गोवंशावर कोसळली आणि जवळपास १० गोवंशाचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.
अकोला शहरासह जिल्ह्यातील विविध भागात काल सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास मेघ गर्जना व सुसाट वाऱ्या सोबत मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसाने अक्षरक्ष: झोडपले. जिल्ह्यातील सर्वच भागात पाऊसाने हजेरी लावल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे.शहरातील अनेक ठिकाणी गुडघ्यावर पाणी साचल्याले. ही अकोला महापालिकेची मान्सून भेट असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आणि घरातील वस्तूंची नासधूस झाली.