Homeराज्यजवाहर गेट येथील शिकस्‍त घर पाडण्‍याची कार्यवाही...

जवाहर गेट येथील शिकस्‍त घर पाडण्‍याची कार्यवाही…

अमरावती – प्रभाग क्र.१४ अंतर्गत जवाहर गेट येथील मुख्य रस्त्यावरील श्री मोहम्मद जफर अब्दुल गणी (भोगवटदार श्री घनश्यामदास पारवाणी) यांची १०० वर्ष जुनी इमारत अति शिकस्त झालेली होती. सदर इमारत पाडणे करीता श्री  मोहम्मद जफर अब्दुल गणी तसेच भोगवटदार यांना वेळोवेळी नोटीसेस देण्यात आल्या होत्या.

तरी संबंधितानी नोटीसेसला कुठलाही प्रतिसाद न दिल्यामुळे तसेच इमारत पडून अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे पश्चिम झोन क्र.५ भाजीबाजार तसेच अतिक्रमण विभाग यांची संयुक्त कारवाई करून सदर इमारतीचे अति शिकस्त असलेले बांधकाम आज दिनांक २१/०६/२०२२ रोजी पाडण्यात आले.

यावेळी झोन क्र.५ चे सहाय्यक आयुक्त तथा उपअभियंता तौसिफ काझी, अतिक्रमण पथक प्रमुख अजय बन्‍सेले, अभियंता सचिन मांडवे, अतिक्रमण विभागाचे योगेश कोल्हे, श्‍याम चावरे उपस्थित होते.  

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments