Homeराज्यरायगडावरून आणलेल्या शिवज्योतीची सांगलीत जल्लोषात मिरवणूक...

रायगडावरून आणलेल्या शिवज्योतीची सांगलीत जल्लोषात मिरवणूक…

सांगली – ज्योती मोरे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त पृथ्वीराज पाटील फाउंडेशन आणि शिवप्रेमींच्यावतीने शिवज्योत रायगडावरून सांगलीत आणण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मारुती चौकातील पुतळ्यासमोर ही ज्योत अखंडपणे तेवत राहणार आहे. अशा प्रकारचा हा देशातला पहिला उपक्रम आहे.शिवज्योतीचे टिळक चौकात प्रचंड जल्लोषात स्वागत करण्यात आले, त्यानंतर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

सायंकाळी पावणे सात वाजता ही शिवज्योत वीरेंद्रसिंह पृथ्वीराज पाटील आणि इतर काही शिवप्रेमींनी मोठ्या उत्साहात सांगलीत आणली. ज्योतीचे स्वागत सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम, पै. नामदेवराव मोहिते, माजी आमदार नितीन शिंदे, किशोर जामदार, संजय मेंढे, मंगेश चव्हाण, संगीता खोत, डॉ. संजय पाटील, अभिजीत भोसले, मयुर पाटील आदींनी केले.

यावेळी कीर्ती देशमुख, वंदना पाटील, स्नेहा सावंत, क्रांती कदम, शरयू पाटील या महिलांनी शिवज्योतीला भक्तिभावाने ओवाळले. यावेळी शिवज्योतीवर फुलांच्या पाकळ्या उधळण्यात आल्या. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या.

टिळक चौकामध्ये यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. अवघे वातावरण शिवमय झाले होते. भगवे फेटे, भगव्या पताका, भगवे झेंडे, फुलांची उधळण आणि ढोल ताशांचा गजर असे सारे आनंददायी वातावरण होते. अग्रभागी सजवलेले घोडे वातावरणात चैतन्य निर्माण करत होते. फटाक्यांच्या आवाजाने परिसर दुमदुमून गेला होता.

ही मिरवणूक पुढे कापड पेठ, मित्र मंडळ चौक, हरभट रोड, गारमेंट चौक, दत्त – मारुती रोड मार्गावरून मारुती चौकात, आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आली. मिरवणुकीत लोक फुले उधळून स्वागत करत होते. महिला ओवाळत होत्या. जसजशी मिरवणूक पुढे जाईल, तस-तशी गर्दी आणि उत्साह प्रचंड वाढत गेला. मिरवणुकीचे रूपांतर प्रचंड संख्येने जमलेल्या शिवप्रेमींच्या सभेत झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments