Homeराजकीयनांदेड जिल्ह्यातील ९१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदान व मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश...

नांदेड जिल्ह्यातील ९१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदान व मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी रविवार 18 सप्टेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील मतदान केंद्र परिसर तसेच सोमवार 19 सप्टेंबर 2022  रोजी मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागू करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी निर्गमीत केले आहेत. 

या निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी यादृष्टीने रविवार 18 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणापासून तर सोमवार 19 सप्टेंबर रोजी मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, चिन्हांचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामव्यतिरिक्त व्यक्तींस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. 

हा आदेश नांदेड जिल्ह्यातील 91 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी ज्या ग्रामपंचायतीचे मतदान होणार आहे अशा मतदान केंद्रावर रविवार 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यंत अंमलात राहील. तसेच मतमोजणी केंद्राच्या परिसरात सोमवार 19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी सुरु झाल्यापासून  मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत हा आदेश लागू राहील, असे आदेशात नमूद केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments